Last Updated on 25 Sep 2023 3:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । ॲड. बी. एस. पाटील यांनी लिहीलेले ‘आनंदयात्री’ आत्मचरीत्र हा एक ऐतिहासीक दस्तऐवज ठरेल,असे प्रतिपादन जेष्ठ समिक्षक प्रा. डॉ. वि. दा. वासमकर यांनी केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या वतीने ॲड. बी. एस. पाटील यांनी लिहीलेल्या ‘आनंदयात्री’ चरीत्रग्रंथाचे समिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ॲड. बी. एस. पाटील होते.जेष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील,डॉ. दीपक स्वामी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचीव ॲड.धैर्यशील पाटील,माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. अरुणादेवी पाटील उपस्थित होत्या.
प्रा. डॉ. वि. दा. वासमकर म्हणाले,’समाजाच नेतृत्व करणारांनी आत्मचरीत्र लिहायला हवीत.आत्मचरीत्र हा पुढील पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असतो.ॲड. बी. एस. पाटील यांनी स्वातंत्रपूर्व काळापासूनचा सामाजिक,राजकीय,ऐतिहासीक जीवनपटच पुढील पिढीसमोर ठेवला आहे.त्यांच्या या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रांजळपणा आणि परखडपणा होय.स्वतःच दुःख जगासमोर न मांडता आपला आदर्श इतरांनी घ्यावा अशी मांडणी त्यांनी या ग्रंथात केली आहे.
जेष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील म्हणाले,मराठी साहित्यात सर्वात कमी लिहीला जाणारा प्रकार म्हणजे आत्मचरीत्र होय.चरीत्र लिहिणारा धाडशी असावा लागतो.ॲड. बी. एस. पाटील यांनी 1943 पासूनचा जीवनपट मांडला आहे.समाजातील अनेक माणस थोरा मोठ्यांची जीवन चरीत्र वाचून घडली आहेत. कोणीही चिरंजीव नसतो तर त्यांनी साहित्यरुपाने लिहीलेल्या चरीत्राच्या माध्यमातून माणस चिरंजीव राहतात.त्यांच्या चरीत्रामधुन त्यांची प्रचंड स्मरणशक्ती दिसून येते.हे चरीत्र म्हणजे व्यक्तीचित्र कस लिहावं याचा उत्तम नमुना आहे.व्यवस्थेवर बोलण्याचं धाडस लेखकाच्या ठायी असल्याशिवाय असं चरीत्र पडत नाही.
प्रा. डॉ. दीपक स्वामी म्हणाले,’समिक्षेच्या वर्तुळाला भेटून जाणारा,समिक्षांच्या सर्व मर्यादा ओलांडून जाणारे हे चरीत्र आहे.राज्यातील सर्व संस्था चालकांना हा ग्रंथ नक्कीच मार्गदर्शक ठरेल.कमीत कमी शब्दात व्यक्तीचीत्रण कसं करावं हे या ग्रंथात पहायला मिळते.आत्मचरीत्र म्हणजे एकांतात स्वतःशी स्वतः केलेला संवाद होय आणि तो संवाद जगासमोर आणताना त्रयस्तपणे मांडण्याच धारीष्ठय त्यांनी दाखवल आहे.आण्णांनी सर्व इतिहास सुक्ष्म पातळीवर मांडला आहे.राजकीय लोकांना तो एक ऐतिहासीक दस्तऐवज म्हणून उपयोगी येणार आहे. त्यांनी साठी नंतरचा परीपक्व जीवनपट उलगडताना कोणतीही उणीव सोडलेली नाही.’
लेखक ॲड. बी. एस. पाटील म्हणाले,’अनेक थोरा मोठयांची जिवन चरीत्र वाचून, अभ्यास करुन झाल्यावर आत्मचरीत्र लिहायचा निर्णय घेतला आहे. सध्या वाचन संस्कृतीचा अभाव दिसत आहे.तरीही पुस्तक लिहीताना लोकांनी वाचावं हा हेतू होता,त्यात उत्पन्न मिळवण्याचा हेतू नाही.जीवनात आनंदी आहे म्हणून आनंदयात्री हे नांव दिले. आजपर्यंत लोकांचा उत्साह वाढवण्याच त्यांना आत्मविश्वास देण्याच काम करत राहीलो.लोकांनी चरीत्र वाचावं आणि प्रतिक्रीय दयाव्यात एवढीच इच्छा आहे. ‘
प्राचार्य डॉ. अंकूष बेलवटकर यांनी प्रास्ताविक केले.प्रा. डॉ. शिला रत्नाकर यांनी आभार मानले.प्रा. संजय चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले.प्रा. डॉ. वृषाली पाटील,प्रा. डॉ. स्नेहल हेगिष्ठे प्रा. डॉ. मेघा संजय पाटील,प्रा. डॉ. मेघा विजय पाटील,प्रा. के. बी. पाटील,प्रा. डॉ. रामचंद्र घुले,प्रा. डॉ. अशोक मरळे,प्रा. निलेश डामसे,प्रा. श्रीकांत जाधव यांनी संयोजन केले.यावेळी प्रा.प्रमोद पाटील,दिलीप मोरे,कोमल श्रीखंडे,अंकीता यादव यांचा सत्कार करण्यात आला.
![]()
महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना सहा पुस्तकांचा संच मोफत पोहोच करणार
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सहसचीव ॲड. धैर्यशील पाटील यांनी राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना ॲड. बी. एस. पाटील (आण्णा) यांनी लिहीलेल्या सहा पुस्तकांचा संच मोफत पोहोच करणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात केली.
![]()











































































