राजकारणात लोकं प्रश्न निर्माण करत नसतात तर दिलेल्या सत्तेचा त्यांच्यासाठी योग्य वापर राजकारणी करतात का हे पाहत असतात.पूर्वी मूल्यमापनाची साधनं नव्हती.त्यामुळे काही गोष्टी कळायला मार्ग नसायचा.रेटून सगळं चालायचं.पण,आता काळ बदलला,पिढी बदलत चालली आहे,त्यातच मूल्यमापनाची अनेक साधनंही उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे आता फक्त त्याचा वापर होत आहे.त्यात गैर असं काही नाही.
चांगली कामं झाली असतील तर काळजी नसते.पण,राजकारणात कोणतंही काम करत असताना तुम्हाला अपेक्षित अशी नव्हे तर लोकांना अपेक्षित अशी कामे केली पाहिजेत.आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं असतं.
दुसरी बाजू : निवडणुकीपुरता नुसता विरोध करूनही काही उपयोग नसतो.तेही लोकांना पटत नसते.केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नव्हे चांगल्या कामांसाठी,लोकांच्या हक्कासाठी विरोध झाला पाहिजे.सत्तेसाठी कायपण हेही लोकांना आवडत नसतं.एखादी गोष्ट पटली नाही तर त्याचवेळी आक्षेप नोंदवला पाहिजे.निवडणुकीच्या काळात घेतलेला आक्षेप हा सत्ता प्राप्त करण्याचा एक भाग असतो.मग हे सगळं चाललं होतं तर त्या-त्या वेळी का आक्षेप घेतला नाही असाही प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळं आक्षेप असेल त्या-त्या वेळी आपलं मत मांडलंच पाहिजे.
डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
विविध कार्यकारी सोसायट्यांना करता येणार ‘हे’ उद्योग,व्यवसाय; जाणून घ्या
चला पर्यटनाला | निसर्गाचं वरदान : ‘तीर्थक्षेत्र रामलिंग बेट’ बहे
महत्त्वाचं : काही लोकं नेत्याजवळ बसून नुसत्या चर्चा,खूषमस्करी करण्यात व्यस्त असतात.तर काही नुसताच द्वेष करत असतात.हे म्हणजे काम झालं असं नसते.तर काहींना चर्चा,खूषमस्करी करून नेतृत्वाची स्वप्न पडत असतात.नेतृत्व करण्यासाठी लोकांसाठी झोकून देवून काम करावं लागतं.लोकांच्या अडचणीच्या काळात सगळं विसरून त्यांचा द्वेष करत बसण्यापेक्षा मदतीचा हात महत्त्वाचा असतो.लोकांच्यासाठी रात्री-अपरात्री वेळ द्यावा लागतो.त्यातूनच नेतृत्व घडत असते.निव्वळ खूषमस्करी,द्वेष करून नेतृत्व घडत नाही,ही फॅक्ट आहे.
काहींना हे ‘पटो अथवा न पटो’ पण हे वास्तव आहे.हे न पटणारे हाताच्या बोटावर नक्कीच दिसतील.पण,सर्वसामान्यांना ते नक्की पटणार.लोकांच्या मनातील हे वास्तव आहे.