‘मैत्री बँक’ च्या माध्यमातून देणार मित्रांना मदतीचा हात !
Decision to start ‘Maitri Bank’ : तब्बल 28 वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात एकत्र आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या 10 वी तील मित्रांना मदतीचा हात देण्यासाठी ‘नुकताच मैत्री बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.येळावी (ता.तासगाव) येथील बाबासाहेब पाटील विद्यामंदीरमध्ये हे विद्यार्थी-विद्यार्थिनी सन 1994-95 साली इयत्ता 10 वी मध्ये शिकत होते.आजच्या धावपळीच्या जीवनात पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी कुपवाड येथील कृष्णा व्हॅली क्लब हाऊसमध्ये ‘स्नेह मेळावा’ घेतला होता.यावेळी सध्या कोण काय करते? हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून ‘मैत्री बँक’ स्थापनेचा निर्णय घेतला.
हेही वाचा – चौक : सभांचा साक्षीदार थकला !
या हायस्कुलमधील अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी इंजिनिअर,वकील,प्राध्यापक, शिक्षक,उद्योजक व प्रगतशील शेतकरी म्हणून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा प्रभावी ठसा उमटवीत आहेत. त्यांनी कृष्णा व्हॅली क्लब येथे आयोजित स्नेहमेळ्यास 50 च्यावर विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी महेश माने यांनी सर्व मित्र-मैत्रिणींचे स्वागत करून स्नेह मेळाव्याची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीत आणि गाण्यांच्या मैफली ने स्नेहमेळाव्याची रंगत वाढविली.
यानंतर प्रत्येकाने आपण काय करतो? तसेच त्यांच्या जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांचे कथन केले. काही प्रसंगी सभागृह अगदी निशब्द झाले. या चर्चेतूनच काही सहकाऱ्यांना आर्थिक मदत करण्यास, ‘मैत्री बँके’ चा विचार पुढे आला आणि सर्वांनी तसा निर्णय घेतला. यावेळी या स्नेह मेळाव्याची आठवण म्हणून प्रत्येकास ‘मैत्री स्मृतीचिन्ह’ भेट देण्यात आले.
हेही वाचा – घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ; परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा
महेश माने,संदीप पाटील,अर्चना पाटील,ज्योती पाटील यांनी अतिशय ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले.अशोक जाधव,नंदकुमार सुर्यवंशी,अनिता सुर्यवंशी यांच्यासह सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन केले.तर विजय जाधव यांनी आभाराने कार्यक्रमाचा गोड समारोप केला.दिवसभर मोठ्या उत्साहात आणि आनंदात असणारे सर्वजण जड पावलांनी आप-आपल्या घरी परतले.
हेही वाचा – मातीतील कुस्तीवर नितांत प्रेम करणारा पैलवान : डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर
हेही वाचा – पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहा; महावितरणचे आवाहन