Last Updated on 06 Apr 2023 9:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र श्री रामलिंग बेटावर टाळमृदूंगाच्या गजरात ‘अंजनीपुत्र हनुमान की जय’ च्या जयघोषात भक्तिपुर्ण वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
समर्थ रामदासस्वामी स्थापित अकरा मारूतींपैकी एक व भव्यदिव्य मूर्ती.निसर्गरम्य परिसर,आनंद आणि आल्हाददायक वातावरणात असलेले मारुती मंदीर. या ठिकाणी नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.पहाटे अभिषेक,महापुजा करण्यात येवून सुर्योदयसमयी सभामंडपात बांधण्यात आलेल्या श्री हनुमानाच्या पाळण्यावर उपस्थित शेकडो भाविकांनी ‘बोला अंजनीपुत्र हनुमान की जय’ या गजरात व टाळमृदूंगाच्या निनादात पुष्पवृष्टी करून हनुमान जयंती उत्सव साजरा केला.जन्मकाळाचे सुश्राव्य किर्तन ह.भ.प. लखन कोकीळ (महाराज) यांनी केले.अभंग व भजनसाथ महादेव घोरपडे,अच्युत नावडकर,रोहित कोळी आदींनी केली.
आरतीनंतर उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला.जयकर पाटील व हणमंतराव आवळेकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले होते.या उत्सवाचे यशस्वी संयोजन रविंद्र बडवे,श्रीराम बडवे,रोहीत बडवे,माणिक बडवे,समीर बडवे,लक्ष्मण बडवे तसेच बडवे पुजारी,रामदास सेवा मंडळ व ग्रामस्थांनी केले.











































































