मुंबई ।
महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव सोमवारी मुंबईत संपला.या लिलावात 448 खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. लिलावात सहभागी झालेल्या एकूण 448 खेळाडूंपैकी केवळ 87 खेळाडूंना बोली लागली. त्याच वेळी,पाच फ्रँचायझी, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी मिळून त्यांना खरेदी करण्यासाठी 59.50 कोटी रुपये खर्च केले. शेवटी दिल्लीच्या पर्समध्ये 35 लाख, गुजरातच्या पर्समध्ये पाच लाख आणि बंगळुरूच्या पर्समध्ये 10 लाख शिल्लक होते. गुजरात, दिल्ली आणि बंगळुरूने सर्वाधिक 18-18 खेळाडू खरेदी केले. तर, मुंबईने 17 तर यूपीने 16 खेळाडूंना खरेदी केले.
वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावाच्या सुरुवातीलाच सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्मृती मानधना हिच्यावर बोली लावण्यात आली.सर्वच पाच फ्रँचायजीने बोली लावण्यात रस दाखवला.मात्र यात सर्व प्रतिस्पर्धी फ्रँचायजींना मागे टाकत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने तब्बल 3 कोची 40 लाख मोजून स्मृती मानधना या तडाखेबाज खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतली आहे.
स्मृती मानधनाचे करिअर
स्मृतीने भारतासाठी 4 टेस्ट, 77 वनडे आणि 112 टी-20 सामने खेळले आहेत.यात टी-20 मध्ये तिने 2651 धावा केल्या आहेत तर वनडे स्मृतीच्या नावावर 3073 धावा आहेत.
या लिलावात 160 हून अधिक परदेशी खेळाडू सहभागी झाले होते,त्यापैकी फक्त 30 खेळाडूंना बोली लागली.त्याच वेळी, 250 हून अधिक भारतीय खेळाडूंनी लिलावात प्रवेश केला होता.त्यापैकी 57 भारतीय खेळाडू लिलावात विकले गेले.लिलावात फ्रँचायझींनी २० खेळाडूंवर एक कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम लुटली.यापैकी चार खेळाडूंना फ्रँचायझींनी 2 कोटी ते 3 कोटी रुपयांमध्ये आणि तीन खेळाडूंना 3 कोटींहून अधिक रुपयांना खरेदी केले.स्मृती मानधना (RCB) लिलावात सर्वात महाग खरेदी केले.तिला 3.40 कोटींची बोली लागली.
त्याचवेळी, इंग्लंडच्या नताली स्कायव्हर (MI) आणि ऑस्ट्रेलियाच्या ऍशले गार्डनर (GGT) यांना 3.20 कोटी रुपयांची बोली लागली. हे दोघेही सर्वात महागडे परदेशी खेळाडू होते. भारताच्या दीप्ती शर्माला (UPW) 2.60 कोटींची बोली लागली.तर, जेमिमा रॉड्रिग्स (DC) 2.20 कोटी रुपयांना आणि शेफाली वर्मा (DC) 2 कोटी रुपयांना विकली गेली.ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीलाही गुजरात जायंट्सने (GGT) 2 कोटी रुपयांना विकत घेतले. फ्रँचायझींनी यावर सर्वाधिक बोली लावली.
नेतृत्व भूमिकांसाठी संघ खेळाडूंमध्ये रस दाखवतात.मुंबईने हरमनप्रीत,नताली स्कायव्हर आणि हेली मॅथ्यूजसारख्या वरिष्ठ खेळाडूंना खरेदी केले.
लिलावाच्या पहिल्या दोन सेटमध्ये बहुतेक खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली.
अंडर-19 वर्ल्ड चॅम्पियन संघातील केवळ सहा खेळाडू विकले गेले.अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या केवळ सहा खेळाडूंची विक्री झाली.यामध्ये यूपीने श्वेताला 40 लाखांना,तर पार्श्वी चोप्रा आणि बॅटर अॅस यशश्रीला प्रत्येकी 10 लाखांना खरेदी केले.दिल्लीने वेगवान गोलंदाज तीतास साधूला 25 लाखांमध्ये,मुंबईने सोनम यादवला 10 लाखांमध्ये आणि गुजरातने शबनम शकीलला 10 लाखांमध्ये जोडले.
अशा प्रकारे झाला लिलाव
🌑 लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे 12 कोटी रुपये होते.
🌑 30 परदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त 90 खेळाडूंची निवड करायची होती,त्यापैकी फक्त 87 खेळाडूंवर बोली लागली.
🌑 फ्रँचायझी जास्तीत जास्त 18 आणि किमान 15 खेळाडूंचा संघ बनवू शकते.यामध्ये १२ भारतीय आणि सहा विदेशी खेळाडू असतील.
🌑 प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त पाच परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवता येईल,परंतु पाचवा परदेशी खेळाडू असोसिएट देशाचा असावा.
🌑 भारताची 41 वर्षीय लतिका कुमारी या लिलावात सर्वात वयस्कर खेळाडू ठरली.
🌑 शबनम सोनम यादव आणि विनी सुजन या तीन खेळाडूंचे वय 15 वर्षे असून ते लिलावात सर्वात तरुण खेळाडू होते.
🌑 या वर्षी महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.
🌑 409 खेळाडूंना 50, 40, 30, 20 आणि 10 लाख रुपये या आधारभूत किमती निश्चित केल्या होत्या.
पाचही संघांची पथके कोणती ?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
स्मृती मानधना 3.40 कोटी, रिचा घोष 1.90 कोटी, एलिस पेरी 1.70 कोटी, रेणुका सिंग 1.50 कोटी, सोफी डिव्हाईन 50 लाख, हीदर नाइट 40 लाख, मेगन शुट 40 लाख, कनिका आहुजा 35 लाख, 30 लाख, , प्रीती बोस 30 लाख, कोमल जंजाड 25 लाख, आशा शोभना रा 10 लाख, दिशा कासट 10 लाख, इंद्राणी राय 10 लाख, पूनम खेमनार 10 लाख, सहाना पवार 10 लाख, श्रेयंका पाटील 10 लाख.
दिल्ली कैपिटल्स
जेमिमाह रॉड्रिग्स 2.20 कोटी, शफाली वर्मा 2.00 कोटी, मारिजाने कॅप 1.50 कोटी, मेग लॅनिंग 1.10 कोटी, एलिस कॅप्स 75 लाख, शिखा पांडे 60 लाख, जेस जॉन्सन 50 लाख, लॉरा हॅरिस 45 लाख, राधा 4 लाख, राधा 4 लाख, राधा 4 लाख मीनू मणी 30 लाख, पूनम यादव 30 लाख, स्नेहा दीप्ती 30 लाख, तानिया भाटिया 30 लाख, तीतस साधू 25 लाख, जसिया अख्तर 20 लाख, अपर्णा मंडल 10 लाख, तारा नॉरिस 10 लाख.
मुंबई इंडियन्स
नताली शिवर 3.2 कोटी, पूजा वस्त्राकर 1.90 कोटी, हरमनप्रीत कौर 1.80 कोटी, यास्तिका भाटिया 1.50 कोटी, अमेलिया केर 1 कोटी, अमनजोत कौर 50 लाख, हेली मॅथ्यूज 40 लाख, क्लो ट्रायॉन, 30 लाख, ग्रॅखम 30 लाख प्रियांका बाला 20 लाख, धारा गुर्जर 10 लाख, हुमैरा काझी 10 लाख, जिंतीमनी कलिता 10 लाख, नीलम बिश्त 10 लाख, सायका इशाक 10 लाख, सोनम यादव 10 लाख.
गुजरात जायंट्स
एशले गार्डनर 3.20 करोड़, बेथ मूनी 2 करोड़, जॉर्जिया वारेहम 75 लाख, स्नेह राणा 75 लाख, अनाबेल सदरलैंड 70 लाख, डायंड्रा डॉटिन 60 लाख, सोफिया डंकले 60 लाख, सुषमा वर्मा 60 लाख, तनुजा कंवर 50 लाख, हरलीन देओल 40 लाख, अश्विनी कुमारी 35 लाख, दयालन हेमलता 30 लाख, मानसी जोशी 30 लाख, मोनिका पटेल 30 लाख, सबिनेनी मेघना 30 लाख, हर्ले गाला 10 लाख, परुणिका सिसोदिया 10 लाख, शबनम शकील 10 लाख
यूपी वारियर्स
दीप्ति शर्मा 2.60 करोड़, सोफी एक्लेस्टोन 1.80 करोड़, देविका वैद्य 1.40 करोड़, तहलिया मैकग्रा 1.40 करोड़, शबनम इस्माइल 1 करोड़, ग्रेस हैरिस 75 लाख, एलिसा हीली 70 लाख, अंजलि सरवनी 55 लाख, राजेश्वरी गायकवाड़ 40 लाख, श्वेता सहरावत 40 लाख, किरण नवगिरे 30 लाख, लॉरेन बेल 30 लाख, लक्ष्मी यादव 10 लाख, पार्शवी चोपड़ा 10 लाख, एस यशश्री 10 लाख, सिमरन शेख 10 लाख