सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांचा फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल सत्कार संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवून संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे असे प्रतिपादन ॲड. पाटील यांनी यावेळी केले.कॉलेजमध्ये प्रथम आलेल्या अनुक्रमे २५ विद्यार्थ्यांचा तसेच सर्वच विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विषयाचे 22 विद्यार्थी व क्रॉप सायन्स या विषयाचे 2 विद्यार्थी यांनी 200 पैकी 200 गुण मिळवून महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना कु सई पाटील, कु प्रांजल सावंत व शार्दुल भास्कर या विद्यार्थ्यांनी तर विजय पाटील,शामराव गावडे, आटपाडकर व भास्कर मॅडम या पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली,
प्रा संजय नागरगोजे, प्रा. मनोज करळे तसेच प्राचार्य एस एल पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार शिंदे व प्रा. स्मिता ढोबळे यांनी तर आभार प्रा. मकरंद बडवे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.