Last Updated on 02 Jun 2023 3:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
प्राचीन मान्यतेनुसार घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी काही खास कामे सांगण्यात आली आहेत.जे लोक हे काम करत राहतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असणे शुभ राहते.तुमच्या घराचे दार असे नसेल तर दारावर सोने,चांदी,तांबे किंवा पंचधातूपासून तयार केलेले स्वस्तिक लावावे.यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल.
दररोज तुळशीची पूजा करणं आणि झाडाला पाणी घालणं ही आपली जुनी प्रथा आहे.हिंदू मान्यतांनुसार प्रत्येक घराच्या बाहेर तुळस असणं आवश्यक मानले गेले आहे.एवढेच नव्हे तर जो माणूस दररोज तुळस खातो, त्याचे शरीर बऱ्याच चन्द्रायण उपवास करणाऱ्यांना मिळणाऱ्या फळासम पावित्र्य प्राप्त करतं.
पाण्यामध्ये तुळशीपत्र घालून अंघोळ केल्याने तीर्थात स्नान करून पावित्र्य होण्यासारखे आहेत आणि जो माणूस असं करतो तो सर्व प्रकारच्या यज्ञात बसण्याचा अधिकारी असतो.
एवढेच नव्हे तर हे वास्तुदोषाला दूर करण्यातही समर्थ आहे.ज्या घरात दररोज तुळशीची पूजा केली जाते, तेथे नेहमी सुख-समृद्धी नांदते. पैशांची कमतरता भासत नाही.म्हणून आपल्याला दररोज तुळशीची पूजा केली पाहिजे.
घराच्या अंगणात तुळस असल्याने घराचे कलह आणि अशांती दूर होते. घरावर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. एवढेच नव्हे तर दररोज दह्यासोबत साखर आणि तुळशीच्या पानांचे सेवन करणं शुभ मानले आहे.
पौराणिक शास्त्रानुसार,तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवी देवांची विशेष कृपादृष्टी मिळते. दह्यासोबत तुळशीच्या पानांचा सेवन केल्याने अनेक प्रकाराचे आयुर्वेदिक लाभ मिळतात. जसे- दिवसभरात कामात मन लागतं, मानसिक ताण होत नाही,शरीर नेहमी ऊर्जावान राहते.
संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवा अवश्य लावावा. खरे तर या साऱ्या बाबी अतिशय सोप्या आहेत. मात्र अनेकदा आपण त्या तशा करत नाही. अर्थात आपण प्रत्येक जण पैसे मिळवण्यासाठी कष्ट करीत असतो. मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवत असतो. त्यातून प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण त्याच्या जोडीला आपण जर पूर्वजांनी सांगितलेल्या या काही गोष्टी केल्या तर त्याचा फायदाच होईल यांत शंका नाही.
![]()
(टीप : या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/विश्वास /धर्मग्रंथांमधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वतः त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल)











































































