देशात प्रत्येक मोठ्या शहरातील सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी आहे.पण या आपल्या देशात सकाळी सर्वात आधी सूर्यकिरण कोणत्या गावात पडतात हा देखील कुतुहलाचा विषय आहे.भारतातील उत्तर पूर्व राज्यात सर्वात आधी सूर्यदर्शन होतं हे सर्वांना ज्ञात आहे.सूर्यकिरण सर्वात आधी पडणाऱ्या या राज्यांना सेव्हन सिस्टर्स असे देखील म्हणतात.
मनमुराद नैसर्गिक सौंदर्य
पण सर्वात आधी सूर्यकिरण देशात कुठे पडतात हा प्रश्न महत्वाचा आहे.तर अरूणाचल प्रदेशात एक गाव आहे,या गावात सर्वात आधी सूर्यकिरण पडतात. या गावाचं नाव आहे,डोंग/दांग. मनमुराद नैसर्गिक सौंदर्य असलेले हे एक छोटंस गाव आहेसमुद्रसपाटी पासून 1240 मीटर उंचीवर असलेले हे गाव लोहित आणि सती नदीच्या संगमावर बसलेले आहे.सकाळी म्हणजे आपल्यासाठी पहाटे 4 ला या ठिकाणी सूर्योदय होतो.
डोंगराच्या माथ्यावर सूर्यदर्शनाचा आनंद
1999 पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात.देश-विदेशातून लोक येथे सूर्याची सर्वात पहिली किरणं पाहण्यासाठी येतात.या देशात एका डोंगराच्या माथ्यावर उभं राहून लोक सूर्यदर्शनाचा आनंद घेतात.
अतिशय निसर्गसुंदर अश्या या गावात साधारण 35 लोक राहतात.शेती हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. येथे पर्यटकांना राहण्यासाठी अजून पुरेश्या सुविधा नाहीत.पाटबंधारे विभागाने शेजारच्या वालोंग गावात पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा दिली आहे.वालोंग येथेच 1962 चे भारत चीन युध्द झाले होते. या ठिकाणी सैन्याचा मोठा तळ आहे. डोंगचा सूर्योदय पाहण्यासाठी येथून 8 किमी चा ट्रेक करून जावे लागते.