देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील नेते नेताजी सुभाषचंद्र बोस.भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध कठीण प्रवास केला. नेताजी उडीसा मधील बंगाली कुटुंबातील आहेत.त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1857 रोजी उडीसा मधील कटक येथे बंगाली कुटुंबात झाला.त्यांच्या आईचे नाव प्रभावती होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ,त्यांच्या पत्नीचे नाव एमेली व त्यांच्या मुलीचे नाव अनिता बोस.नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी जपान देशात विमान दुर्घटनेत झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबात 7 भाऊ व 6 बहिणी होत्या.नेताजी हे आई-वडिलांचे नववे अपत्य.सुभाषचंद्र बोस त्यांचा मोठा भाऊ शरदचंद्र यांच्याशी ते विचाराने खूप जवळ होते.तर त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे पेशाने प्रसिद्ध व मेहनती वकील होते.म्हणून त्यांना रायबहादूर अशी उपाधी मिळाली. नेताजींना लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती.शालेय जीवनात ते शिक्षकांचे प्रिय विद्यार्थी होते. त्यांना खेळण्यात रसिकता नव्हती.
नेताजींचे माध्यमिक शिक्षण कटक मध्ये पूर्ण झाले.ते पुढच्या शिक्षणासाठी कलकत्त्याला गेले.त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फिलॉसॉफी विषयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.कॉलेजमधील जीवनात ब्रिटिश प्रोफेसर भारतीयांना त्रास देऊ लागले .त्यांनी जातिवादाविरुद्ध आवाज उठवला ,तर असं पहिल्यांदाच घडलं. नेताजींच्या मनात ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा चालू झाला.
नेताजींना सिविल सर्विस करण्याची इच्छा होती.ब्रिटीश शासनानुसार भारतीयांना सिविल सर्विस मध्ये जाणे खूप कठीण काम होते.तर नेताजींच्या वडिलांनी सिविल सर्विसच्या तयारीसाठी त्यांना इंग्लंडला पाठवले.त्या परीक्षेत नेताजी चौथ्या क्रमांकावर आले व इंग्लिश विषयात त्यांनी खूप गुणवत्ता दाखवली. नेताजी स्वामी विवेकानंदांना आपले गुरु मानत.त्यांच्या विचारांचे ते अनुसरण करत. तसेच त्यांच्या मनात देशभक्ती खूप होती.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते चिंताग्रस्त होते.1921 रोजी त्यांनी इंडियन सिविल सर्विसची नोकरी लाथाडली व ते भारतात परत आले.
भारतात परत आल्यानंतर ते स्वातंत्र्य लढाईत उतरले. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत सहभागी झाले.सुरुवातीला नेताजी काँग्रेस कलकत्ता पार्टीचे नेते होते. चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली ते काम करीत होते.चित्तरंजन दास यांना राजकीय जीवनातील गुरु मानत असत.
1922 मध्ये चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेस सोडून त्यांची वेगळी ‘स्वराज्य पार्टी ‘बनवली.
जेव्हा चित्तरंजन दास आपल्या पार्टी मध्ये राजकीय डावपेच आखत होते, तेव्हा त्यावेळी कलकत्त्यामध्ये नेताजींनी युवक व युवती ,मजदूर यांच्या मनामधे एक वेगळीच जागा निर्माण केली होती.ती भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करून स्वातंत्र्य भारताचे स्वप्न पाहत होते.बोस यांना लोक ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या नावांनी ओळखू लागले.त्यांच्या कामाची चर्चा सगळीकडे होत होती.नेताजी नवीन विचारांची ओळख घेऊन आले आणि युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
1928 रोजी गुवाहाटीमध्ये काँग्रेसच्या बैठकीत नव्या व जुन्या सभासदांमध्ये मतभेद चालू होते. ते नेते कोणतेही नियमानुसार जाणारे नव्हते.स्व- मतानुसार चालणारे होते. जुने नेते ब्रिटिश शासनाच्या नियमानुसार पुढे जाणार होते.
सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांचे विचार वेगळे होते.नेताजींना गांधीजींचा अहिंसेचा मार्ग मान्य नव्हता.नेताजींचे विचार युवा नेत्याचे होते म्हणजे हिंसेमध्ये त्यांना विश्वास दिसत होता.
1939 मध्ये नेताजी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदासाठी उभे राहिले तर गांधीजींनी त्यांच्याविरुद्ध पटाबी व सीतारामिया उभे राहिले पण नेताजींनी त्यांना हरवले. गांधीजींनाही हार वाटली तेव्हा ते खूप दुःखी झाले.हे समजल्यानंतर नेताजींनी आपल्या पदाचा कोणताही विचार न करता राजीनामा दिला.विचारांचा ताळमेळ नसल्यामुळे नेताजी गांधींच्या विरोधात आहेत असे जनतेला वाटले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पार्टी सोडली.
1939 रोजी भारतीय विश्व युद्ध चालले होते तेव्हा त्यांनी आपले अस्तित्व दाखवले नेताजींनी सगळ्या देशाची मदत मागत होते ह्या विचाराने ब्रिटिशांच्यावर वरून दबाव पडेल व ते देश सोडून जातील असे त्यांना वाटले. पण ह्या विचारांचा प्रभाव वेगळाच उमटला.ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. बंदिस्त केल्यानंतर त्यांनी दोन आठवडे अन्नपाणी सोडले व त्यांची तब्येत बिघडली. हे पाहून देशातील युवा तरुण आक्रमक झाले व त्यांच्या सुटकेची मागणी केली.
तेव्हा सरकारने त्यांना कलकत्त्यामध्ये नजरबंदी ठेवले.दरम्यान 1941 मध्ये आपली भाची शिशिर तिच्या मदतीने पळून गेले.सर्वात प्रथम बिहार मध्ये ‘गोमहा’ पोहोचले.तिथून ते पण पाकिस्तानमधील पेशावरमध्ये गेले व तेथून सोवियासंगम मधून थेट जर्मनीला गेले.तेथे नेताजी जर्मनी शासक ‘हिटलर,’ यांना जाऊन भेटले.राजकीय क्षेत्रात येण्याअगोदर नेताजी जगातील अनेक देश फिरले होते.त्यांना प्रत्येक देशातील समज होती.त्यांना माहीत होते की हिटलर व जर्मनीचा शत्रू इंग्लंड होता.ब्रिटीशांचा बदला घेण्यासाठी फुट पाडणे गरजेचे होते.त्यांनी शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असे त्यांनी धोरण आखले.
त्याच दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाची कन्या ‘एमेली’ हिच्याशी विवाह केला तिच्या सोबत ‘बर्लिन’मध्ये राहत होते.त्यांना अनिता बोस ही मुलगी झाली.नेताजी 1943 ला जर्मन सोडून जपानला गेले. तिथे त्यांना मोहन सिंग भेटले. ते ‘आझाद हिंद सेनेचे’ मुख्य होते.नेताजी ,मोहन सिंग, रास बिहारी बोस, यांनी मिळून “आझाद हिंद सेनेची “स्थापना झाली. नेताजींनी आझाद हिंद सरकार पार्टी बनवली.
1944 रोजी आझाद हिंद फौजेमध्ये तुम “मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा”हे घोषवाक्य बनवले. संपूर्ण देशात या घोषवाक्याने क्रांती घडवून आणली.नेताजी इंग्लंडला गेले व ब्रिटिश लेबर पार्टीचे अध्यक्ष व राजकीय लोकांना भेटले. भारताचे स्वातंत्र्य व भारत मातेचे भविष्य या विषयावर चर्चा केली. ब्रिटिशांना जवळ जवळ भारत सोडून जाण्यास तयारच केले होते.
पण दुर्देवाने 1945 रोजी नेताजी जपानच्या प्रवासाला निघाले तेव्हा ताइवान येथे विमान दुर्घटना झाली. पण त्यांचे पार्थिव मिळाले नाही. त्यांना काही दिवसानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.भारत सरकारने शोध तपास कमिटी अंतर्गत काम सुरू केले परंतु अद्याप देखील त्यांच्या मृत्यूचे रहस्य सापडले नाही.
तमाम भारतवासीयांनी नेताजी यांच्या सारख्या थोर क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशी राष्ट्रनिष्ठा जागवूया हेच खरे आजच्या दिवसाचे त्यांचे स्मरण ठरेल एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करते…
जय हिंद…| जय भारत…|
वंदे मातरम..|
शब्दांकन: सौ स्वाती धनराज जंगम.
(नागांव) कोल्हापूर.
टोपण नाव :(स्वाती धन)