नवी दिल्ली । लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने आज पश्चिम बंगालमधील चार जागांसह सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर 10 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहेत.
ज्या विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहेत त्यामध्ये बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्य प्रदेशमधील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर, पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशमधील हमीपूर आणि दे नालागड या मतदारसंघाचा समावेश आहे.
संपूर्ण निवडणूक वेळापत्रक
निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जून आहे. 24 जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. तर 10 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून 13 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
अनुक्रम असा : राज्याचे नाव,विधानसभा मतदारसंघ नाव,जागा रिक्त होण्याचे कारण
01. बिहार- रुपौली – श्रीमती बिमा भारती यांचा राजीनामा
02. पश्चिम बंगाल – रायगंज – श्री कृष्ण कल्याणी यांचा राजीनामा
03. राणाघाट दक्षिण (SC) – डॉ. मुकुट मणी अधिकारी यांचा राजीनामा
04. बागडा (SC) – श्री. बिस्वजित दास यांचा राजीनामा
05. माणिकतळा = साधन पांडे यांचे निधन
06. तामिळनाडू – विक्रवंदी – थिरू. एन. पुगाझेंथी यांचे निधन
07. मध्य प्रदेश – अमरवारा (ST) – श्री. कमलेश प्रताप शाह यांचा राजीनामा
08. उत्तराखंड – बद्रीनाथ – श्री राजेंद्र सिंग भंडारी यांचा राजीनामा
09 मंगलॉर – सरवत करीम अन्सारी यांचे निधन
10 पंजाब – जालंधर पश्चिम (SC) – श्री. शीतल अंगुरल यांचा राजीनामा
11 हिमाचल प्रदेश – डेहरा ० श्री. होशियार सिंग यांचा राजीनामा
12 हमीरपूर – श्री. आशिष शर्मा यांचा राजीनामा
13 नालागड – श्री. के. एल. ठाकूर यांचा राजीनामा
पोटनिवडणुकीचे वेळापत्रक
Poll Eकार्यक्रम | वेळापत्रक |
Date राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख | 14.06.2024 (शुक्रवार) |
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख | 21.06.2024 (शुक्रवार) |
Dat अर्जांची छाननी करण्याची तारीख | 24.06.2024 (सोमवार) |
Last उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख | 26.06.2024 (बुधवार) |
मतदानाची तारीख | 10.07.2024 (बुधवार) |
मतमोजणीची तारीख | 13.07.2024 (शनिवार) |
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख | 15.07.2024 (सोमवार) |