सांगली । नेर्ले येथील ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्री स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील हे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सिने अभिनेते राहुल मगदूम हे होते.राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपट जगताप तसेच लहू जगताप त्याचबरोबर संग्राम जाधव हे उपस्थित होते.
स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. सुदर्शनी राहुल जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी मम्मा प्री स्कूल नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमातून कशा पद्धतीने समोर येते व विद्यार्थी विकास हाच उद्देश समोर ठेवून सातत्याने विद्यार्थ्यांवरती नवनवीन प्रयोग कसे मम्मा प्री स्कूलमध्ये केले जातात या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी दिली.
प्रतीक पाटील (दादा) म्हणाले,आपल्या भागामध्ये मम्मा प्री स्कूल ही अशी एक चांगली शाळा आहे की ज्या गोष्टी पुणे मुंबई या ठिकाणी शिकवल्या जातात त्याच पद्धतीच्या किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचे शिक्षण मम्मा प्री स्कूल मध्ये दिले जाते या गोष्टीचं खूप कौतुक आहे.मम्मा प्री स्कूल नेहमी संपूर्ण जगभरातल्या शिक्षण तज्ञांचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवते व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागा करते.मम्मा प्रि स्कूलचे विद्यार्थी आकाशवाणी केंद्रावरती तसेच वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनच्या चैनल वरती कार्यक्रम सादर करून आले त्याची प्रचिती आत्ताच मी दोन-चार विद्यार्थ्यांचे भाषण ऐकल्यानंतर केली.त्यामुळे मम्मा प्री स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांचे भविष्य खूप उज्वल आहे.
त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवली त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम पार पडला व स्कूलच्या शिक्षिका श्रद्धा जाधव,प्राजक्ता पाटील,प्रज्ञा बल्लाळ,श्वेता गावडे,सहाय्यक शिक्षक ऐश्वर्या देवकुळे व संगीत शिक्षक विनय लोहार,प्रणव कचरे,डान्स शिक्षक सुरेश तिवारी,तनुश्री वाघमारे व सूत्रसंचालक संकेत मोरे यांचाही स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आले.
आभार प्रिन्सिपल सौ. दर्शू जगताप यांनी मानले तर सर्व पालक,विद्यार्थी, शिक्षक,यांच्या सहकार्यामुळे मम्मा प्री स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.