सांगली । बहे (ता. वाळवा) येथील प्रा.डॉ. राजाराम आत्माराम पाटील (वय ५६) यांचे हृदयविकाराने निधन झाले.इस्लामपूर येथील कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते.तत्पूर्वी काही वर्षे त्यांनी दैनिक केसरी मध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिले होते.रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर तसेच दि रयत सेवक को ऑपेटिव्ह बँकेचे संचालक जयराम पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.दशक्रिया विधी १८ जानेवारी रोजी तर उत्तरकार्य २१ जानेवारी रोजी बहे येथे होणार आहे.