सांगली । तुजारपूर (ता.वाळवा) येथील श्रीमती तानूबाई दत्तू पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.वाळवा तालुका राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष व राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे माजी अध्यक्ष,पत्रकार रामचंद्र दत्तू पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात चार मुलगे,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी आहे.