ओंकारची दुबई येथे होणार्या आंतरराष्ट्रीय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड
सांगली । सुरत (गुजरात) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये बोरगाव (ता.वाळवा) येथील ओंकार उदयसिंह पाटील याला सीनिअर 74 किलो वजनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला.
इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने सुरत येथे दि. 9 व 10 डिसेंबर रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत ओंकार पाटील याने सीनिअर 74 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला.त्याने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय स्पर्धेत उंचावली आहे.दुबई येथे होणार्या आंतरराष्ट्रीय आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याची निवड झाली आहे.जिम प्रशिक्षक हर्षद बारे यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.