सांगली । आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स कॉमर्स कॉलेजने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश मिळवले.
इचलकरंजी येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय पुरुष कुस्ती स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.स्वप्नील पाटील यांने 97 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले आहे.त्याची हरियाणा चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाकडून निवड झाली आहे.तसेच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संजना बागडी हिने कडेपूर येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेमध्ये 76 किलो वजनी गटात तृतीय क्रमांकसह कास्यपदक पटकावले.
यावर्षी शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाने दैदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. ऋषिराज माने यांनी योग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तर स्वप्निल कोळेकर यांनी बांबू उडी मध्ये कास्यपदक मिळवले आहे.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक आ. जयंत पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर डी सावंत व सहसचिव,प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.