बेंगळुरू । वर्ल्ड कप 2023 मधील पराभवाचा बदला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत घेतला.भारतीय संघाने 4-1 मालिका खिशात घेतली. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने सहा धावांनी जिंकला.
आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला होता. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांमध्ये एकही सामना हरला नव्हता आणि अंतिम फेरी गाठली. पण अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला.पण वर्ल्ड कप 2023 मधील पराभवाचा बदला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत घेतला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंग दिली. त्यानंतर भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत 160 धावा केल्या. जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे 21 आणि 10 धावा केल्या.श्रेयस अय्यर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या.श्रेयसने 37 बॉलमध्ये 53 रन्स केल्या.कर्णधार सूर्यकुमार यादव 5 आणि रिंकू सिंह 6 रन्स करुन तंबूत परतले.विकेटकीपर जितेश शर्मा याने 24 आणि अक्षर पटेल याने 31 धावा केल्या.तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 धावा केल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 154 धावा करता आल्या.बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक 54 धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने 28 आणि मॅथ्यू वेडने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.ऑस्ट्रेलियाला 20 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती.ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्यु वेड बँटींगमसाठी उभा.ही शेवटची ओव्हर अर्शदीपने देण्यात आली.त्याने मॅथ्यु वेड याला आऊट केले त्यानंतर भारतीय संघाच्या जिंकण्याच्या आशा वाढल्या.त्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या व भारतीय संघाला विजय मिळाला.या सामन्यात भारतीय संघाच्या मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.