पोलिसांनी अठरा दिवसांत उघड केला गुन्हा
अकॅडमीची फी भरण्यासाठी केली चोरी
गारगोटी । भुदरगड तालुक्यातील बारवे येथील 14 तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली.त्याच्याकडील सर्व दागिने जप्त केले आहेत.याप्रकरणी अर्जुन शामराव पाटील (रा. बारवे) याला अटक केली.पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीची फी भरण्यासाठी पैशाची कमतरता भासू लागल्याने अर्जुन याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, बारवे येथील चोरीप्रकरणी भुदरगड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.बारवे येथील बजरंग पाटील यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून ६ नोव्हेंबरला चोरट्याने पाठीमागील दरवाजातून प्रवेश करून घरातील मोबाईल चार तोळ्याचे व तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन तोळ्याची साखळी,दोन तोळ्याचा लक्ष्मीहार,अर्धा तोळ्याचे कानातील झुबे,चार अंगठ्या,चार हजार शंभर रुपयांची रोकड असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरला होता.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी सापळा रचून त्याला अटक केली.त्याच्याकडून सर्व सोने व रोकड ताब्यात घेतली.अठरा दिवसांत पोलिसांनी हा गुन्हा उघड केला.