तुळसी विवाह
आरंभ – शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023
समाप्ती – सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023
तुळसी विवाह सोहळ्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती असल्यामुळे शास्त्राने तिचे नाते देवांशी इतरांशी व मानवाशी जोडून दिलेले असावे.
त्वचारोगावर तसेच खोकला,सर्दी,पडसे इ .सारख्या जुनाट रोगावर तर तुळस हे प्रभावी औषध सांगितलेले आहे.दररोज जी पूजा केली जाते ती पूजा तुळसी खेरीज पूर्ण होत नाही.मृत व्यक्तीच्या मुखात गंगा जला प्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते.तुळसीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळावे यात काही नवल नाही.हल्लीच्या युगात विविध प्रकारचे प्रदूषण रोखण्यास तुळस हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो.शास्त्रीय प्रयोगातून निष्पन्न झालेल्या माहितीनुसार तुळस ही वनस्पती दिवसा व रात्री ओझेन वायू सोडते इतर वृक्षाप्रमाणे ते रात्री कार्बन-ऑक्साइड वायू सोडत नाही.त्यामुळे प्रत्येकाच्या अंगणात तुळसी वृदावन आसणे हे धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या तसेच वास्तुशास्त्र व आरोग्याच्या दृष्टीने शुभ लक्षण मानले जाते.
म्हणून रोजच्या तुळसी पूजेच्या व प्रदक्षिणे च्या निमित्ताने तसेच तुळसी विवाहाच्या निमित्ताने तुळसी चे सानिध्य मानवास लाभावे हा त्या पाठीमागे उद्देश असावा असे मला वाटते.
कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी.या एकाशीला भगवान विष्णू जागे होतात म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात.
कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी भगवान विष्णूंचा तुळसीशी विवाह केला जातो.
तुळसी विवाह धार्मिक महत्व
ज्या घरात तुळसी विवाह होतो तेथील उपवर मुली उपवर वधू मुले यांचे विवाह सुकर होतात असा समज आहे.
तुळशीस रंग देऊन,फुलांच्या माळा सोडून,रोषनाई इ .सुशोभित करून पुढे रांगोळी काढून , तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते.
तुळशीभोवती ऊस उभे केले जातात .याचे कारण म्हणजे
या विवाह सोहळ्यात – वधू तुळस बाळकृष्ण वर आणि ऊस मामाच्या भूमिकेत असतो असे माझ्या वाचनात आले आहे.
विष्णू अर्थात बाळकृष्ण आणि तुळस याची षोडोशोपचार प्रथम पूजा केली जाते.पूजा मध्ये विशेषता चिंच,आवळे ‘काकन हळदीकुंकू इ .याचा समावेश असतो.नंतर आनंद उत्साहान मंगलाष्टके म्हणून विवाह संपन्न केला जातो.
मंगलाष्टके
ॐ स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.