सांगली । भवानीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन 2002-2003 एसएससी बॅचकडून विद्यालयास शालेय भौतिक सुविधांसाठी 19 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
क्रांतिसिंह नाना पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन 2002-2003 एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात ही मदत देण्यात आली.तब्बल 20 वर्षांनंतर या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यावेळी शाळा सल्लागार समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य किरण माळी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश सावंत,तसेच गणेश कुमठेकर,सागर शहा,सुहास सावंत,संतोष वाघचौरे,अमोल माळी,गणेश पवार,अल्ताफ नदाफ,अंकुश मोरे तसेच बॅचमधील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक आर. डी.पवार,माजी शिक्षक निकम सर,बी. डी.पवार सर,एम. एस.पाटील सर,लाड सर,टोणपे मॅडम,एस. एच.पाटील मॅडम तसेच माजी सेवक वर्ग गोंदील मामा,एम.के.पाटील आबा आदी उपस्थित होते.
अल्ताफ नदाफ यांनी सूत्रसंचलन केले.सुहास सावंत यांनी प्रास्ताविक केले.सागर शाह यांनी आभार मानले.