सांगली । बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर शनिवारी रात्री इस्लामपूर येथे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याला जाणारे ऊसाने भरलेले ट्रॅक्टर रोखले.तर 5 ते 6 वाहनांची हवा सोडली.
ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे तसेच ऊसदर लवकर जाहीर करा जाहीर करा या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे.बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे व कार्यकर्त्यांनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर शनिवारी रात्री इस्लामपूर येथे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याला जाणारे ऊसाने भरलेले ट्रॅक्टर रोखले.यावेळी ट्रॅक्टर चालक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.तरीही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या तयारमधील हवा सोडली.
ऊस दरासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.या आंदोलनात गणेश शेवाळे यांच्यासह भूषण वाकळे,अशोक सलगर,बळीराजाचे जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष शहाजी माने आदी कार्यकर्ते सहभागी होते.