आपणा सर्वांना लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ।
रविवार, दि.12/11/2023
अश्विन कृष्ण अमावस्या म्हणजे लक्ष्मी -कुबेर पूजनाचा दिवस.
संपूर्ण परिसर स्वच्छ करून,घरामध्ये माळा तोरणे बाधून दीपोत्सवात व मंगल वाद्यात लक्ष्मीपूजन करणे म्हणजे खरा आनंद उत्सव !
लक्ष्मी पूजन करताना चलनी नाणे,लक्ष्मीची प्रतिमा,कुबेर म्हणून सुपारी याची मुख्यत्वे पूजा केली जाते.काही जन तर चांदीची नाणी ,सोने अलंकार वापरतात.
लक्ष्मी पूजनामुळे घरात अदंभ व निरहंकार लक्ष्मीचा सहवास रहातो .कारण लक्ष्मी प्राप्ती होणे हे एक वेळ सुलभ आहे .पण लक्ष्मी प्राप्त झाल्यावर अंगी मद,अहंकार,दम,व्यसनाधीनता,दर्प हे दुर्गुण शिरु न देणे हे महत् कठीण असते.म्हणून या दिवशी लक्ष्मी पुजेबरोबर अलक्ष्मीनि:सारण,म्हणजे कुबेर पूजन केले जाते.कारण कुबेर ही धन देवता आहे.पण कुबेराचा साक्षात सहवास परम वैराग्यशाली आदिनाथ शंकराशी असल्यामुळे तो लक्ष्मी पुत्रांना कधीही उन्मत्त होऊ देत नाही.त्यासाठी घरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मी पूजन केले जाते.
मम आत्मनः श्री लक्ष्मीप्रीतिद्वारा अलक्ष्मी -परिहार पूर्वकमं क्षेम -स्थैर्य -दीर्घायु:आरोग्य – विपुल श्रीप्राप्ती – सन्मङ्गल – महैश्वर्य – कुलाभ्युदय – सुखसमृद्ध्यादि -कल्पोक्त -फलावाप्तये सकल-बाधा -निवारण – पूर्वकं गृह -सौख्य मन:शांती सिद्धार्थ
मम उदमकर्माणि अप्राप्त-लक्ष्म्या:शीघ्रप्राप्त्यर्थं प्राप्तक्षम्याः चिरकाल -वासार्थं ऋण -परिहार -पूर्वकं आय-वृद्धयर्थं कुबेर सहित श्री महालक्ष्मी-प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलीत -उपचार द्रव्यैः ध्यान अवाहनादि – षोडशोपचार – पूजनं करिष्ये ॥
असा संकल्प करून पूजन करावे.
पूजेच्या वेळी नैवेद्यात साखर,धने फुटण्याचा समावेश असावा.तसेच मंत्रपुष्पांजलीत भाताच्या लाह्यांचा समावेश असावा.कारण भाताच्या लाह्या हे भर्जित कर्माचे प्रतीक आहे.म्हणजे हातून कर्म होत राहते.पण त्याचा लेश मात्र आपणास लागत नाही.म्हणजेच हातून खऱ्या अर्थाने कर्मयोग होत राहतो.पण त्याच्या फायद्या – तोट्याचे दुष्परिणाम आपल्या मनावर होत नाहीत.दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास उद्योग धंदा करताना होणाऱ्या नफा तोट्याचा मनावर इष्ट, अनिष्ट परिणाम न होता, मनाचा समतोल राहतो.साखर फुटाणे किंवा बताशे हे गोडाचे प्रतीक आहे.कारण वाणी व कृती जितकी गोड तितकी पारलौकिक उन्नती गोड व चांगली.
काही व्यापारी लोक याच दिवशी बलिप्रतिपदेचे लक्ष्मी व सरस्वती अर्थात वही पूजन करतात.कारण अमावसेस म्हणजे शून्य अवस्थेत कार्यारंभ झाल्यास तो प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत वाढत जातो अशी या मागची भूमिका आहे.शक्यतो गुरुजींच्या कडून पूजन करून घ्यावे.पण पूजेसाठी गुरुजी म्हणून – ब्राह्मण,पुरोहित,जंगम उपलब्ध न झाल्यास आपल्या आपल्या कुल पुरोहितांचा पान सुपारी दक्षिणेचा विडा काढून ठेवून आणि वरील प्रमाणे मनोभावे पूजन करायला काहीच हरकत नाही.
लक्ष्मी-कुबेर पूजन मुहूर्त
रविवार
दि.12/11/2023
दीपावली,नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान -चंद्रोदयी अभ्यंग स्नान करावे .
चंद्रोदय-पहाटे 5. 33
अपमृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पण करून यमाची प्रार्थना करावी
प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः ।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती ॥
लक्ष्मी-कुबेर पूजन
दुपारी 01.45 ते 03.10
सायंकाळी 06ते 08.50
रात्री -08.50 ते 11.00
शक्यतो सायंकाळी करावे.
पुनश्च आपणा सर्वांना लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ।
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.