मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Update) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
संबंधित परीक्षेची परीक्षायोजना,अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
स्पर्धा परीक्षांच्या संभाव्य तारखा :
- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – १७ मार्च
- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २८ एप्रिल
- महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – १६ जून
- राज्यसेवा मुख्य परीक्षा – १४ ते १६ डिसेंबर
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २३ नोव्हेंबर
- अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – ९ नोव्हेंबर
- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
- महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२३ नोव्हेंबर
- महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – २८ ते ३१ डिसेंबर