सांगली । केंद्र सरकार व राज्य सरकारने लोकांसाठी ज्या योजना राबविल्या व त्या लोकांच्यापर्यत पोहचवुन लाभ दिला यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत यश खेचुन आणता आले,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमाचे खर्या अर्थाने यश म्हणावे लागेल,कारंदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविणारे आहे,भाजपा पक्ष या गावाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (दादा) यांनी केले.
उरुण इस्लामपूर येथील प्रकाश शैक्षणिक,आरोग्य संकुल येथे कारंदवाडी गावचे नूतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले- पाटील (दादा) म्हणाले राज्यात व सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पहाता सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागले.हा निकाल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महायुतीच्या सरकारवर विश्वास अधोरेखित करणारा आहे. कारंदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व सर्व पक्षीय सरपंच पदाचे उमेदवार निवडून दिला. कारंदवाडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही. लोकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी लोकाभिमुख काम करावे असे आवाहन निशिकांत भोसले पाटील (दादा) यांनी शेवटी केले.
कारंदवाडी लोकनियुक्त नूतन सरपंच हिम्मत पाटील, नूतन ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, रूपाली सावंत, अर्चना सरदेशमुख, सुजाता खोत, मधुमती कांबळे, इंदुताई खामगळ, अरुणा हजारे यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (दादा)यांनी केला.
यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील, माजी अध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चा माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा वाळवा तालुका संघटन सरचिटणीस व पॅनल प्रमुख संदीप सावंत, प्रशांत उर्फ बिटू पाटील, सचिन सावंत, कारंदवाडी कृष्णानगर भाजपा अध्यक्ष सदाभाऊ यादव, राजेंद्र घबाडे,बजरंग कामिरे, अनिल सरदेशमुख, माणिक पाटील,ज्येष्ठ नेते शंकर हाके, दिनकर सरदेशमुख, सुभाष वाडकर, सुरज भोसले, स्वप्निल खामगळ आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.