भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारताची आंतरराष्ट्रीय ओळख म्हणजे विवेधतेतून एकता हि आहे. जिथे अनेक जाती-धर्माचे लोक सलोख्याने राहतात. भारत अशी एक भूमी आहे जिच्या कुशीत हजारो वीर जन्माला आले आहेत. आणि भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा दिले आहे.
जेव्हाही भारत मातेवर शत्रूने आक्रमण केले होते त्यावेळेस आपल्या मातृभूमी ला वाचविण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी आपले प्राण देऊन आपल्या मातृभूमी चे रक्षण केले होते. आजही या मातृभूमी वर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास आपले सैनिक कधीही सज्ज आहेत.
भारत देशाने कधीही शांततेला अधिक महत्व दिले आहे. आपल्या देशाची परंपरा खूप महान आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल असा आपला भारत देश आहे.
म्हणूनच आठवले जेव्हा राकेश शर्मा अवकाशात गेले होते तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले कि अवकाशातून आपला देश कसा दिसतो तर त्यांनी सांगितले होते, “सारे जहा से अच्छा हिन्दोस्तां हमारा”
१) भारतरत्न – Bharat Ratna
भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ज्या व्यक्तींनी कला, विज्ञान, साहित्य, तसेच जनसेवा या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्यास त्या व्यक्तींना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिल्या जातो. आणि २०१३ पासून या पुरस्कारासाठी आणखी एका क्षेत्राला यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ते म्हणजे क्रीडा क्षेत्र.
- भारतरत्न ची सुरुवात 2 जानेवारी 1954 ला तत्कलीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली होती.
- भारतरत्न पुरस्कार अश्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी मानवतेसाठी कोणत्याही क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी केली असेल.
- सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, परंतु 1955 पासून हा पुरस्कार मरणोत्तर देखील द्यायला सुरुवात झाली. सर्वात पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लालबहादूर शास्त्री यांना मिळाला होता. आतापर्यंत एकूण 12 लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे.
- भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत राजकारणातील व्यक्तींना जास्त वेळा देण्यात आला आहे. हा पुरस्कार आतापर्यंत 21 नेत्यांना मिळाला आहे.
- पंतप्रधान भारतरत्न पुरस्कारासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस पाठवतात परंतु असं दोन वेळा झालं आहे कि पंतप्रधानांनी भारतरत्न पुरस्कार स्वतःला दिला होता. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असताना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.
- 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी भारतरत्न पुरस्कार देणं बंद केलं होतं. परंतु 1980 काँग्रेस च सरकार आल्यानंतर भारतरत्न पुरस्कार देणं पुन्हा चालू करण्यात आलं.
- सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार 1992 मध्ये देण्यात आला होता, परंतु त्यांच्या मृत्यूबाबत काहीही ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार मागे घेण्यात आला.
- भारतरत्न पुरस्कार नावासमोर पदवी म्हणून वापर करता येत नाही.
- भारतरत्न पुरस्कारासोबत कोणतीही रक्कम दिली जात नाही परंतु राष्ट्रपति द्वारा हस्ताक्षरित एक प्रमाण पत्र व एक मेडल दिले जाते.
- भारतरत्न पुरस्कार फक्त भारतीय व्यक्तींनाच दिला गेला पाहिजे असा काही नियम नाही, आतापर्यंत 2 परदेशी नागरिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पाकिस्तनचे अब्दुल गफ्फार खान यांना 1987 मध्ये व दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांना 1990 मध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे.
- एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींनाच हा पुर
पुरस्काराचे स्वरूप :
या पुरस्काराचे स्वरूप एका पिंपळाच्या आकाराचे पदक असतं, ज्यावर एका बाजूला सूर्य बनलेला असतो, सोबतच खालच्या बाजूला चांदी मध्ये तसेच देवनागरी भाषेत “भारतरत्न” असे लिहिलेले असतं. तसेच त्याच्या दुसऱ्या बाजूला भारतीय मुद्रे सोबत आपल्या देशाचे ब्रीदवाक्य “सत्यमेव जयते.” लिहिलेले असतं. आणि या पदकाला पांढऱ्या लेस सोबत दिल्या जातं.
- सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी. व्ही. रमण, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. यांना देण्यात आला होता.
- या पुरस्काराला माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना सुद्धा दिल्या गेला आहे, सांगायचे कारण हेच कि ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले प्रधानमंत्री होते.
- २०१४ मध्ये सचिन तेंदुलकर यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ते हा पुरस्कार मिळवणारे भारतातील सर्वात युवा व्यक्ती आहेत.
२) पद्म विभूषण – Padma Vibhushan
पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो. हा पुरस्कार भारतरत्न नंतर दिल्या जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी कला, विज्ञान, सामाजिक कार्य, तसेच यामध्ये सरकारी कर्मच्यार्यांच्या द्वारा देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सेवाही समाविष्ट आहेत.
या पुरस्काराची सुरुवात सुद्धा २ जानेवारी १९५४ रोजी करण्यात आली होती.
पुरस्काराचे स्वरूप :
या पुरस्काराचे पदक हे गोलाकार आकाराचे असून त्याच्या एका बाजूला कमळाचे फुल असतं. त्या कमळाच्या फुलाच्या वरच्या बाजूला “पद्म” आणि खालच्या बाजूला “विभूषण” देवनागरी भाषेत लिहिलेले असतं. गोलाकार आकाराच्या या पदकाला काही रेखाचा घेर असतो. या पदकाला तांबे आणि कथिल या दोहांचे मिश्रण करून बनविलेले असतं.
- सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार सत्येंद्र नाथ बोस, नंदालाल बोस, बाळासाहेब गंगाधर खेर,वि.के कृष्ण मेनन, झाकीर हुसेन यांना देण्यात आला होता.
- २००८ मध्ये सचिन तेंदुलकर यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ते हा पुरस्कार मिळवणारे भारतातील सर्वात युवा व्यक्ती आहेत.
३) पद्म भूषण – Padma Bhushan
पद्म भूषण हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जातो.
पद्मविभूषण नंतर दिल्या जाणारा हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात विलक्षण कामगिरी केली आहे, यामध्ये सरकारी कर्मच्यार्यांच्या द्वारा देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सेवाही समाविष्ट असतात.
पुरस्काराचे स्वरूप :
या पुरस्काराचे पदक हे गोलाकर आकाराचे असून, या पदकाचे स्वरूप जवळजवळ पद्मविभूषण च्या पदकासारखे असतं. फक्त या पदकामध्ये फुलाच्या वरच्या बाजूला “पद्म” आणि खालच्या बाजूला “भूषण” असे लिहिलेले असतं. सोबतच पदकाला बाजूने कडा सुद्धा असतात. त्या कडा कथिल आणि तांबे यांच्या मिळून बनलेल्या असतात. या पदकाच्या मध्यभागी दोन्ही कडून चांगल्या प्रतीचे सोने वापरले असतं, ज्यामध्ये मुद्रा आणि फुलाचा समावेश असतो.
- सर्वात प्रथम १९५४ मध्ये हा पुरस्कार होमी भाभा, शांती स्वरूप भटनागर, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, सुकुमार सेन, रमेश राय हांडा, राधाकृष्ण गुप्ता, आणि अमरनाथ झा, यांना देण्यात आला होता.
४)पद्म श्री – Padma Shri
पद्मश्री हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, या पुरस्काराला पद्मभूषण नंतर भारतामध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, यामध्ये सरकारी कर्मचारी आणि त्यांनी दिल्या गेलेल्या सेवेचा सुद्धा सामावेश आहे. हा असा पुरस्कार आहे ज्या पुरस्काराला फक्त भारतीय नागरिकांना देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरूप :
पद्मश्री पुरस्काराचे पदक हे गोलाकार आकारचे असून त्या पदकामध्ये अग्रभागी “पद्म” तसेच खालच्या बाजूला “श्री” लिहिलेले असतं. सोबतच बाकी पदाकांप्रमाणे या पदकांमध्ये सुद्धा कडा असतातच. त्यासुद्धा तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणातून बनलेल्या.या पुरस्काराची सुरुवात सुद्धा १९५४ मध्येच झालेली आहे.
- सर्वप्रथम हा पुरस्कार डॉ.मथुरा दास, डॉ के. आर.चक्रवर्ती, आणि अखिल चंद्र मिश्रा यांना देण्यात आला होता.