सातारा । सातारा शहरातील शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,पोलीस अधीक्षक समीर शेख,निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी,सातारा वासीय मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सोहळ्याच्या सुरवातीस जलमंदीर राजवाडा येथे भवानी तलवारीस पोलीस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली.त्यानंतर जलमंदीर राजवाडा ते पोवई नाका शिवतीर्थपर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये हत्ती,घोडे,उंट,ढोलताशा पथक यांचा समावेश होता.
शिवतीर्थ येथे मिरवणूक दाखल झाल्यानंतर भवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात आली.