तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा घाणेरडा वास येणे या समस्येला जगातील अनेक लोक सामोरे जात आहेत.ही अतिशय सामान्य समस्या असली तरीही अनेकांना याचा त्रास होत आहे.यामुळे अनेकदा लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते.अनेकदा दांतांची आणि तोंडाची योग्य काळजी घेऊनही श्वासातून दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना सतावते.यामुळे बऱ्याचदा लोकांध्ये जात असताना अशी व्यक्ती कचरते.श्वासाची दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्याने किंवा तोंडाच्या इतर दीर्घ आजारांच्या लक्षणांमुळे ही दुर्गंधी येऊ शकते.जर तुम्ही तोंडाच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल तर अशा परिस्थितीत दुर्गंधी दूर करण्यासाठी काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.
लवंगाचा वापर करा
लवंगमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करू शकतात. तुम्ही लवंगा तोंडात ठेवून चघळू शकता.
लिंबू पाण्याचे सेवन करा
टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा वापरा
बेकिंग सोडा तोंडाची आम्लता कमी करते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी निर्माण करणार्या बॅक्टेरियाची वाढ रोखता येते. तुम्ही तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा मिक्स करू शकता किंवा पाण्यात मिसळून तोंड स्वच्छ धुवू शकता.
पुदीना किंवा तुळशीची पाने चावा
जर तुम्हाला नेहमी श्वासाची दुर्गंधी येत असेल. तर तुम्ही तुमच्या खिशात पुदिना किंवा तुळशीची पाने यांसारख्या काही औषधी वनस्पती ठेवाव्यात. हे नक्कीच तुमचे दात स्वच्छ होत नाही, परंतु ते तुम्हाला तीव्र वासापासून वाचवेल. किंवा तुम्ही पुदीना आणि तुळशीची पाने पाण्यात घालून त्याचे सेवन देखील करू शकता.
बडीशेप आणि वेलची फायदेशीर
या दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.जेवणानंतर थोडी बडीशेप आणि वेलचीचे सेवन करू शकता. जर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे या काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होईल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही याचा त्रास होणार नाही. त्यामुळे आजपासूनच या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा.
सफरचंद देखील फायदेशीर
घरातून बाहेर पडताना एक सफरचंद सोबत ठेवा. सफरचंदांमध्ये ऑक्सिडाइज्ड पॉलिफेनॉल असतात, जे श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.आणि ते त्यांच्या टेक्सचरमुळे तुमचे दात देखील स्वच्छ करतात.त्यामुळे सफरचंदाचा तुम्हाला दुहेरी फायदा होईल.
टीप : लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी,कृपया तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.