अधोरेखित ऑनलाईन डेस्क । चांद्रयान-३ च्या यशानंतर,भारताने आता सूर्याकडे झेप घेतली आहे.त्यासाठी मिशन आदित्य-L1 चे प्रक्षेपण आज करण्यात आले आहे.भारताच्या या सूर्य मोहिमेबाबत भारतासह संपूर्ण जगात उत्सुकता वाढली आहे.हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवरून सूर्याचा अभ्यास करेल.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी,’आदित्य एल-1′ ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असलेल्या ‘लॅग्रेन्जियन-1’ बिंदूवर पोहोचण्यासाठी 125 दिवस लागणार आहेत.
सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती.पीएसएलव्ही (PSLV-XL) रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणे सहज शक्य होणार आहे.
लॉन्च झाल्यानंतर 125 दिवसांनी ते त्याच्या पॉइंट L1 वर पोहोचेल.या टप्प्यावर पोहोचल्यानंतर आदित्य-एल1 अतिशय महत्त्वाचा डेटा पाठवण्यास सुरुवात करेल.
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे.पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे.त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे.दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल.तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल.चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल.पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
आदित्य-L1 चे वजन किती ?
आदित्य-एल1 चे वजन 1480.7 किलो आहे.प्रक्षेपणानंतर सुमारे 63 मिनिटांनी आदित्य-एल1 अंतराळयान रॉकेटपासून वेगळे होईल.तसे,रॉकेट 25 मिनिटांत आदित्यला निश्चित कक्षेत पोहोचवेल.या रॉकेटच्या सर्वात लांब उड्डाणांपैकी हे एक आहे.
जाणून घ्या PSLV-XL या रॉकेटबद्दल…
पीएसएलव्ही रॉकेटचे हे ५९ वे उड्डाण आहे.
PSLV-XL हे प्रकारातील 25 वे उड्डाण आहे.
हे रॉकेट 145.62 फूट उंच आहे.
प्रक्षेपणाच्या वेळी वजन 321 टन आहे.
हे चार टप्प्याचे रॉकेट आहे.6 स्ट्रैप ऑन समाविष्टीत