इस्लामपुरातील काडेपेटी संग्रह बनला आकर्षणाचे स्तोत्र
काडेपेटी संग्रह या जगात संग्रह अनेक प्रकारचे आहेत.अनेकांना काही ना काही छंद असतोच.जसे काडेपेटी, नोटा, कॉइन, काडेपेटी, पोस्टकार्ड, पेन, आरसे, पुस्तके, खेळणी अशी कितीतरी प्रकारचे संग्रह करणारे या जगात विखुरलेले आहेत.त्यापैकीच एक अवलिया नासिर संदे यांच्यामुळे इस्लामपुरातील काडेपेटी संग्रह आकर्षणाचे स्तोत्र बनले आहे.
जे खरोखरच मानवी मनाला आकर्षित करतात.त्यातूनच एक आगळावेगळा आनंद प्राप्त होतो.अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आष्टा येथे संगणक विभागात कार्यरत असणारे नासिर संदे यांना बालपणापासूनच वेगवेगळे छंद जोपासण्याचे आवड मित्रांसोबत त्यावेळी काडेपेटी जमवण्याचा हा त्यांचा रोजचा खेळ होता.त्यावेळी जेव्हा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मिळू लागल्या तेव्हा पासून मात्र संग्रह करण्याचा एक छंदच मनात घर करून गेला.आणि आज अखेर गेल्या पस्तीस वर्षात खूप मोठा संग्रह झाला.आणि आज जवळपास तीन हजार विविध काडेपेटीचा संग्रह कसा झाला हे कधी कळलच नाही.1 इंच लहान काडेपेटी पासून 6 ते 12 इंच इतक्या मोठ्या काडेपेटीचे अनेक प्रकार त्यांच्याकडे पाहायला मिळतात.
प्रत्येक काडेपेटीचा रंग,डिझाईन,वेगवेगळे फुले,पक्षी,प्राणी,खेळणी,क्रिकेट,खेळाडू,हीरो हीरोइन,वाहने,राष्ट्रीय पक्षी,राष्ट्रीय प्राणी,देवदेवता,म्युझिक वाद्य,नेते,स्वातंत्र्यदिन, घरगुती वस्तू ,इंटरनेट,गुगल,व्हाट्सअप अशा प्रकारचे एक ना हजार प्रकार आणि म्हणूनच या काडेपेटी वर असलेली विविधता म्हणजेच विविध भाषा विविध प्रसंग संवाद पाहून त्यावर थोडा थोडा अभ्यास केल्यावर त्यांच्या असे निदर्शनास आले की काडेपेटीचा रोजच्या वापराबरोबरच विविध भाषा,संस्कृती,धर्म, इतिहास,सणवार याबाबतची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोचवली जाते.हा ही एक चांगला उद्देश साध्य होतो.
तसं पाहिलं तर सर्वांनाच माहीत आहे की मराठीत आपण काडेपेटी म्हणतो.पण त्याचबरोबर त्याला हिंदीत माचिस म्हटलं जातं किंवा दियासलाई,तामिळमध्ये टिपणी,काश्मीरमध्ये मदक डब्ल्यू,तेलंग मध्ये अग्निपुत्र,बांगला मध्ये देशराई,गुजराती मध्ये दियासली,पंजाबी मध्ये दिलीपतीला,नेपाळमध्ये मध्ये मेनसलाई अशी कित्येक नावे आहेत.हा संग्रह कसा केला हे सांगताना असे समजले की आपल्या शहरापासून संपूर्ण देशात व विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी असणारे त्यांचे मित्रमंडळी,नातेवाईक हा संग्रह ज्यांनी पहिला ते सर्व असे या सर्वांना संग्रहाबद्दल माहिती दिल्यामुळे या सर्वांकडून वेगवेगळे काडेपेटी प्रकार मिळत गेले.