अंधश्रद्धेची जळमटे काढून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज
नुकताच युरोपचा दौरा केला.युरोप पाहण्याचे अनेक दिवसाचे स्वप्न पूर्ण झाले,त्या दौऱ्यात अनेक अनुभव आले.त्याबद्दल थोडे लिहावे म्हणून लिहीत आहे.
अंधश्रध्दा जगभर आहेत,माणूस शिकला,प्रगती केली,आधुनिक झाला म्हणून अंधश्रद्धेची मानसिकता राहणार नाही असे बिलकुल नाही,बुध्दी गहाण टाकली,विचार करायचे सोडले की व्यक्ती अंधश्रद्धाळू बनते,युरोपमधील प्रगत भागातही काही अंधश्रध्दा दिसतात.
बेल्जियम ची राजधानी ब्रसेल शहर,खूप सुंदर,आखीव रेखीव,वास्तू रचनांचा सुरेख नमुना आपणास पाहण्यास मिळतो.तेथील ‘ग्रँड प्लेस’ येथील प्राचीन भव्य दिव्य राजवाडे,इमारती भारीच आहेत.बघत रहावे.जुन्या इमारती जपून ठेवल्या आहे,याच ‘ग्रँड प्लेस’ च्या एका कोपऱ्यात एक महिलेचे सुंदर शिल्प आहे,या शिल्पावरून हात फिरवल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात,अशी अंधश्रध्दा आहे.हजारो लोक शिल्पावरून हात फिरवताना दिसले…तिथे सुध्दा अंधश्रध्देच्या मानसिकतेची लोक आहेत.

रोम शहरातील हा प्रसिध्द Trevi fountain,fountain च्या बाजूला पाठ करायची आणि मनात इच्छा धरून एक नाणे टाकायचे..इच्छा पूर्ण होणार..ही पण निखालस अंधश्रध्दा

ब्रसेल मधील हे महिलेचे शिल्प.या शिल्पावरून हात फिरवल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात…अशी अंधश्रध्दा
इटली मधील रोम शहरातील…रोम मध्ये Trevi fountain आहे,शहराच्या मध्यभागी हा धबधबा आहे,प्रचंड गर्दी असते,या धबधब्याकडे पाठ करून उभे राहिले,मनात इच्छा धरायची आणि एक नाणे त्या धबधब्यात टाकायचे इच्छा पूर्ण होतात…असे तीन नाणी टाकून तीन इच्छा पूर्ण करू शकता.तरुणाईची मोठी गर्दी दिसत होती.ही सुध्दा निखालस अंधश्रध्दा म्हणावी लागेल.या धबधब्याच्या समोर एक चर्च आहे,त्या चर्चच्या गेट ला कुलूप लावले की मैत्री-प्रेम कधीही तुटत नाही,अभेद्य राहते अशी गैसमजुत आहे.म्हणून शेकडो लोकांनी या गेट ला कुलपे लावली आहेत,बदामाच्या आकाराची जास्त कुलपे होती.जिथे जिथे माणूस विवेक हरवून बसतो,तिथे तिथे अंधश्रध्दा येतात.
तरी बरे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर ला कुलपे लावण्याची मोठी अंधश्रध्दा होती,कुलपे लावून लावून ‘आयफेल टॉवर’चे वजन वाढायला लागले हे तिथल्या शासनाच्या लक्षात आल्यावर सर्व कुलपे तोडून काढली.आता प्रशासन लक्ष ठेवून असते,कुलपे लावून दिली जात नाहीत…आधुनिक माणूस म्हणून राहायचे असेल तर अंधश्रध्दा मुक्त रहावे लागेल.त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३३ वर्षे सक्रीय आहे.
संजय बनसोडे
राज्य प्रधान सचिव,अं.नि.स. महाराष्ट्र