बायको : मी हरवली तर तुम्ही काय कराल?
नवरा : मी वर्तमानपत्रात जाहिरात देईन.
बायको : अरे व्वा. तुम्ही किती छान आहात.
त्या जाहिरातीत काय लिहाल
नवरा : तू जिथे असशील तिथे सुखी राहा.
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक खट्याळ मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून उपाशी असून त्या मुलाचा शोध घेत आहे.
नवरा : माझ्या छातीत खूप दु:खायला लागलय, ताबडतोब अँब्युलन्सला फोन लाव
बायको : हो लावते, तुमच्या मोबाइलचा पासवर्ड सांगा!
नवरा : राहू दे, थोडं बर वाटतंय आता…
बायको : आहो, तुम्ही तर म्हटले होते की,
दिवाळी पर्यंत मद्यपान करणार नाही?
नवरा : हो, मी म्हणालो होतो,
पण दिवाळीत रॉकेट सोडविण्यासाठी
रिकामी बाटली तरी पाहिजे न !
लग्न झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता….
नवरा – याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.
बायको – तू मला सोडून जाशील ?
नवरा – स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही.
बायको – तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?
नवरा – होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.
बायको – तू मला विसरून जाशील ?
नवरा – त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.
बायको – तू मला शॉपिंग ला नेशील
नवरा – नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.
बायको – तू मला मारपीट करशील ?
नवरा – तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.
बायको – तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
आणि (लग्नानंतर ) त्या दोघांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !