माघ वद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्री होय .प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात चतुर्दशी व्रत असते ,पण पौराणिक कथांमध्ये माघ महिन्यातील शिवरात्रीस विशेष महत्त्व आहे .
ईशान संहितेत शिवलिंग तयोद्भूत : कोटी सूर्यसमप्रभ :
या वचनानुसार माघ वद्य चतुर्दशीच्या मध्यरात्री ,ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव झाल्यामूळे , या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात .
मध्यरात्री असलेल्या चतुर्दशी दिवशी महाशिवरात्री व्रत केले जाते .
ॐ नमः शिवाय या षडाक्षरी, किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राने यथाशक्ती जप केला जातो.शिवमहिम्नस्तोत्र,शिवलिंगावर रुद्राभिषेक,एक लक्ष हजार किंवा 108 बिल्वपत्र वाहण्याची प्रथा आहे .
दिवसभर उपोषण.रात्री शिव पुजन’ भजन.दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णू पूजन करून पारणे सोडले जाते.
एकदा एका व्याधाला गर्भवती हरिण दिसली.तिला पाहताच तिच्यावर तो बाण सोडणार तो,ती इतक्यात म्हणाली हे व्याधा मला मारू नको,कारण मी गर्भवती आहे बाळंत झाल्यावर मी,नक्की येथे परत येईन .नंतर तू मला मारलेस तरी चालेल.ठिक आहे.तू नक्की परत ये असे म्हणून व्याध बेलाच्या झाडावर जावून बसला.तिची प्रतीक्षा करीत असताना सहज चाळा म्हणून व्याध बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला . ती नेमकी खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती.हे अनायासे घडले .
पुढे वचन दिल्याप्रमाणे हरीण तिचा पती व आपल्या बालकासह तेथे आली.त्याच्याशी बोलण्यात वेळ गेल्यामुळे,त्या व्याधास सहज जागरण झाले.जागरणाचे पुण्य लाभल्यामुळे शंकर प्रसन्न होऊन विमान घेऊन तेथे आले.व्याघ आणि हरिण यास घेऊन स्वर्गात गेले.तेथे त्यांना कायमचे सुख प्राप्त झाले.
यावरून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत्त करतील त्यास अक्षय सुख मिळते भावनेने महाशिवरात्री व्रत करण्याची परंपरा आहे.
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.