सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणावर कंगना रनौत हिचे मोठे वक्तव्य
मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित जे काही बोलले आहे त्यात तथ्य आढळले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौतने केले आहे. तिने अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीत हे विधान केले.
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करत नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला होता.यासाठी तिने एक व्हिडिओ देखील जारी केला होता.यात कंगना घराणेशाही, स्टार किड्स या सर्व विषयांवर खुलेपणाने बोलली आहे.कंगनाच्या या व्यक्तव्यांचे अनेकांनी समर्थन केले आहे.दरम्यान, “मी केलेले दावे सिद्ध करु शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करेन,” असे मोठे वक्तव्य कंगनाने आता केले आहे.सध्या कंगना तिच्या मूळ गावी मनाली मध्ये आहे.
एका आघाडीच्या न्यूज चॅनलशी बोलताना कंगना म्हणाली,मुंबई पोलिसांनी मला बोलवले आणि मीही त्यांना सांगितले की मी मनालीमध्ये आहे.माझा जवाब घेण्यासाठी कोणाला तरी माझ्याकडे पाठवा,परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही.मी तुम्हाला सांगते जर मी असे काही बोलले आहे ज्याचा मी पुरावा देऊ शकणार नाही,जे मी सिध्द करु शकत नाही आणि जे जनतेच्या हिताचे नाही,तर मी माझा पद्मश्री परत करेन.मी त्याच्यासाठी पात्र नाही. अशा प्रकारची विधाने करणारी मी व्यक्ती नाही आणि आतापर्यंत मी जे काही बोलली आहे ते जनतेच्या हिताचे आहे.