मतमोजणी 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून
सांगली । जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 75.96 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबरच्या आदेशानुसार पूर्वनियोजित 3 डिसेंबरऐवजी मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे.
जिल्ह्यातील उरूण -ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
आठ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये उत्साहपूर्ण मतदान
उरूण–ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस या नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या नगरपंचायतींमध्ये मतदान शांततेत पार पडले. सर्व ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नगरपरिषदनिहाय मतदानाचे आकडे
-
उरूण–ईश्वरपूर : 64,215 पैकी 47,608 – 74.14 टक्के
-
विटा : 46,332 पैकी 36,770 – 79.36 टक्के
-
आष्टा : 30,573 पैकी 22,856 – 74.76 टक्के
-
तासगाव : 32,994 पैकी 23,249 – 70.46 टक्के
-
जत : 28,090 पैकी 20,464 – 72.85 टक्के
-
पलूस : 22,067 पैकी 17,716 – 80.28 टक्के
-
शिराळा (नगरपंचायत) : 13,095 पैकी 10,879 – 83.08 टक्के
-
आटपाडी (नगरपंचायत) : 20,611 पैकी 16,410 – 79.62 टक्के
शासनाची काटेकोर तयारी
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहआयुक्त (नगरप्रशासन) दत्तात्रय लांघी, डॉ. पवन म्हेत्रे, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली. पोलिसांचा चोख बंदोबस्त कायम होता.

आठही नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, निवारा, आरोग्य सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष मदत अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काही केंद्रांवर विशेष मतदान केंद्र आणि गुलाबी मतदान केंद्रे सजवण्यात आली होती.
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई । वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीस... Read more










































































