Last Updated on 03 Dec 2025 6:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यावर 20 डिसेंबरपर्यंत बंदी
मुंबई |राज्यातील सर्व 288 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. तसेच मतदान समाप्तीच्या अर्धा तासापर्यंत कोणत्याही ‘पोस्ट-पोल सर्व्हे’ अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर करता येणार नाहीत, अशीही सक्त सूचना न्यायालयाने दिली. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश कळवले आहेत.
✔ मतदान यंत्रांसाठी कडक सुरक्षा
आयोगाने मतदान यंत्रांची हाताळणी अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आदेश दिले आहेत.
-
ईव्हीएम ठेवलेल्या सर्व गोदामांमध्ये 24 तास सुरक्षा तैनात राहील.
-
सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म, अग्निशमन यंत्रणा यांसारखी उपकरणे नीट कार्यरत आहेत की नाही, याची खात्री करून घ्यावी.
-
राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करणे बंधनकारक असेल.
-
उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना गोदामाचे प्रवेशद्वार स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी बसण्याची जागा निश्चित करून द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
✔ कुठे मतदान झाले, कुठे बाकी?
राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये आज मतदान पार पडले.
याशिवाय सुधारित कार्यक्रमानुसार:
-
24 नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये अध्यक्ष व सर्व सदस्यपदांसाठी
-
76 नगरपरिषद व नगरपंचायतींमधील 154 जागांसाठी
20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.
✔ मतमोजणी – 21 डिसेंबर, सकाळी 10 वाजल्यापासून
या सर्व निवडणुकांसाठी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता एकाच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 16 Dec 2025 9:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली । स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श... Read more













































































