Last Updated on 27 Aug 2024 4:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सकल हिंदू समाजातर्फे आयोजन
सांगली । इस्लामपूर (ता.वाळवा) येथे गुरूवार दि. २९ ऑगस्ट रोजी इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतरण व्हावे, बांगलादेशमधील पीडित हिंदूंना न्याय मिळावा, लव्ह जिहाद विरोधात तरुणींच्या तसेच महिला व लहान मुलींच्या चरित्राच्या सुरक्षेसाठी राज्यात कठोरात कठोर कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा व सभा आयोजित करण्यात आली आहे, तरी या मोर्चाला हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपूर हे नामांतरण व्हावे, बांगलादेशमधील पीडित हिंदूंना न्याय मिळावा, लव्ह जिहाद विरोधात तरुणींच्या तसेच महिला व लहान मुलींच्या चरित्राच्या सुरक्षेसाठी राज्यात कठोरात कठोर कायदा लागू करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजा मार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा व सभा आयोजित करण्यात आली आहे. हिंदू धर्म योद्धा आ.नितेश राणे, भरत आदमापुरे व हिंदू रणरागिणी हर्षाताई ठाकूर हे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चास सुरुवात होऊन मोर्चा महावीर चौक-गांधी चौक- छत्रपती संभाजी चौक-काशी विश्वेश्वर मंदिर-गणेश भाजी मंडई-गांधी चौक मार्गे यल्लमा चौक येथे येणार असून यल्लमा चौक येथे सभा पार पडणार आहे. तरी हिंदुत्ववाद्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी उरुण-ईश्वरपूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











































































