फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा जल्लोष
सांगली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूर येथे भाजपातर्फे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण दाखवण्यात आले. तसेच लाडू वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करत
जल्लोष करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकार स्थापन झाले आहे. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरले आहेत. इस्लामपूर येथे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण दाखवण्यात आले. तसेच लाडू वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास रचला आहे. देशाचा प्रमुख प्रामाणिक असल्याने देश विकासात अग्रेसर आहे. देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम असून त्यांनी जगाची अर्थव्यवस्थ तीन नंबरला आणून ठेवली आहे. ५७६ वर्षांपूर्वीचे राम मंदिर बांधणीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. येत्या पाच वर्षात देश प्रगतीपथावर असलेला दिसेल, असा मी विश्वास व्यक्त करतो.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोक खोत,एल. एन.शहा, सरचिटणीस संदीप सावंत, भास्कर कदम, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे, अजित पाटील, सरचिटणीस प्रवीण परीट, अक्षय पाटील, सुभाष शिगण, तानाजी पाटील, अक्षय कोळेकर,गजानन पाटील, सुनील मदने, ऍड. उमेश कोळेकर, धनराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे, संतोष कुबुरे, सयाजी जाधव, सुभाष पाटील,आप्पा शिंदे, विकास पाटील, सुयेश पाटील, अनिकेत पाटील, वाहिद मुजावर, आशिष पाटील, संग्राम पाटील, कादर मुंडे, प्रा.दत्तात्रय पाटील, अविनाश जाधव, अमोल खोत, इस्लामपूर शहर भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा स्मिता पवार, अश्विनी कांबळे, रेशमा कांबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.