चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. आपल्यामध्ये चहाप्रेमी खूप आहेत. काहीजणांना तर चहा अमृताप्रमाणे आहे. चहाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. चहामध्ये कोरा चहा, दुधाचा चहा, काळा चहा, ग्रीन टी असे आहेत. यामधील कोरा म्हणजेच काळा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे.
काळा चहाचे फायदे-
काळा चहा हा आपल्या हृदयाला फार गुणकारी असतो. हा चहा प्याल्याने आपले हृदय निरोगी आणि बळकट रहाते. दररोज दोन ते तीन कप ब्लॅक टी प्राशन करण्याने आपण प्रोस्ट्रेट, फुफ्फुस आणि किडनी यांच्या कर्करोगापासून मुक्त राहू शकतो.
मेंदूच्या पेशींनाही हा चहा प्रेरणा देतो. काळा चहा प्याल्याने मेंदूच्या पेशींना रक्ताचा पुरवठा वाढतो. दिवसातून चार वेळा हा चहा प्राशन केला तर सगळ्या प्रकारच्या तणावापासून सुटका होते. या चहात टॅनीन हे द्रव्य असते आणि ते आपल्या पचन संस्थेला गुणकारी ठरते. पचनाची ताकद वाढवते आणि गॅसेस वगळता पचन संस्थेचे अनेक दोष दूर करण्यास ते उपयोगी ठरते.
चहातल्या विशिष्ट घटकांमुळे तरतरी आणि उत्साह वाढते आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन किंवा ब्रिटनचे राजे चार्ल्स असे अनेक सेलिब्रेटी ब्लॅक टी घेऊनच दिवसाची सुरुवात करतात.
काळा चहा प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार कमी होऊ शकतात. अतिसार आणि उलट्या होण्यालासुद्धा यामुळे अटकाव होतो.
चहा सेवनामुळे यात असलेल्या पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. काळा चहा पिणाऱ्यांच्या देशात काही प्रकारचे मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतात.
सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकत. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो.
योग्य प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. ज्या स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता 8 टक्के कमी असते.
लठ्ठपणा आहे तर आपण हा कोरा चहा घ्या. कोरा चहा घेण्याने आपल्या शरीरातील जी मेटापॉलिसीम प्रोसेस आहे म्हणजेच चयापचय प्रक्रिया. या प्रक्रियेचा वेग वाढतो.
टीप- दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.adhorekhit.com याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.