सांगली । इस्लामपूर येथील निशिकांत दादा स्पोर्टस् फाउंडेशन,उरुण-इस्लामपूर आयोजित भव्य राज्यस्तरीय नमो चषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाशिक अटलरी संघाने १ विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवत नमो चषक पटकावला.या स्पर्धेत निशिकांत दादा स्पोर्टस् फाउंडेशन संघ उपविजेता ठरला.
उपांत्य फेरीचा पहिला सामना निशिकांतदादा स्पोर्ट्स फौऊंडेशन विरुद्ध खालसा युथ क्लब,नांदेड या दोन संघात झाला.अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला.हा सामना बरोबरीत सुटला.स्ट्रोकवर झालेला सामन्यात ४ विरुद्ध १ गोलने निशिकांतदादा स्पोर्ट्स फौऊंडेशन विजय मिळवला.ऋषिकेश कलगुटगी हा या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला.
उपांत्य फेरीतील दुसरा सामना नशिक अटलरी विरुद्ध शिवतेज स्पोर्ट्स,कोल्हापूर या दोन संघात झाला.या सामन्यात शिवतेजचा खेळाडू शुभम जाधव याने ९ व्या मिनिटाला गोल नोंदवला.त्या पाठोपाठ लगेचच नाशिक अटलरीचा खेळाडू मोहनपाल याने ११ व्या मिनिटाला गोल नोंदवला.त्यानंतर नाशिक अटलरीचा खेळाडू विवेक मोगली याने १८ व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल नोंदवला.तसेच ५९ व्या मिनिटाला नाशिक अटलरी संघाचा खेळाडू आनंदकुमार याने गोल करून आपल्या संघाला ३ विरुद्ध१ गोलने विजय मिळवून दिला.नाशिक अटलरी संघाचा मोहनपाल हा मॅन ऑफ द मॅच ठरला.
अंतिम सामना निशिकांत दादा स्पोर्टस् फाउंडेशन, इस्लामपूर व नाशिक अटलरी या दोन संघादरम्यान झाला. नाशिक अटलरीच्या मनपित सिंग याने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर वर गोल नोंदवला. नाशिक अटलरी संघाने १ विरुद्ध शून्य गोल करून विजेतेपद पटकावले. निशिकांतदादा स्पोर्टस् फाउंडेशन संघ या स्पर्धेतला उपविजेता ठरला.
बेस्ट फॉरवर्ड – अनुराग विश्वकर्मा, नाशिक अटलरी, बेस्ट हाफ- मनपिर सिंग नाशिक अटलरी, बेस्ट डीफेन्स- उदय कुरणे, एनडीएसएफ, बेस्ट गोल किपर- ऋषिकेश कुलगुडी, एनडीएसएफ, बेस्ट मॅन ऑफ द टूर्नामेंट – स्वप्नील पाटील,एनडीएसएफ या खेळाडूंना देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या संघांना प्रकाश पब्लिक स्कुलच्या प्रशासिका सुनीता भोसले-पाटील यांच्या हस्ते तर भाजपाच्या महिला उपाध्यक्षा आशाताई पवार, माजी नगरसेवक शिवाजी पवार, जी.एस. पाटील, इस्लामपूर शहर मंडल उपाध्यक्ष भास्कर मोरे, भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका उपाध्यक्ष अभिजीत पाटील, भाजपा इस्लामपूर शहर सरचिटणीस प्रवीण परीट, माजी नगरसेवक शकील सय्यद, अमोल पाटील, जयसिंग पाटील,मुकुंद रासकर, ऍड. सूयेश पाटील, सयाजी पवार , मधुकर ढेरे-पाटील, अश्विनी पाटील, रामचंद्र उदुगडे, कादर मुंडे, मुनतासिर पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
पंच म्हणून मनोज इनानी,दिनेश मयेकर,संजय डोंगरे,इशांत शेख,राहुल गावडे,ओंकार भांडवले,सागर जाधव,सारंग घरमाणे,मनोज चव्हाण,महेश कानवडे,कौस्तुप सोनवणी यांनी काम पाहिले.भाजपा सांगली जिल्हा क्रीडा प्रकोष्ट संयोजक व निशिकांत दादा स्पोर्टस् फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशिक्षक अशोक जाधव यांनी आभार मानले. निशिकांत दादा स्पोर्टस् फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.