सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आयुष सचिन कुंभार यांने जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद सांगली द्वारा आयोजित जिल्हास्तरीय तायक्वोंदो स्पर्धेत सांगली जिल्हयामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय तायक्वोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
प्रकाश शिक्षण संकुलाचे संस्थापक श्री निशिकांत भोसले -पाटील,शाळेच्या प्रशासिका सौ सुनिता निशिकांत भोसले-पाटील,प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार नायर,उपप्राचार्या सौ सिंधू नायर सर्व क्रीडा शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गानी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.