पुणे । गावातील जमीनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्यांना आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायतीला देऊन कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो.तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची ई पिक पाहणी या मोबाईल अॅप द्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे,दुष्काळ,अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत.परंतु तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसलेबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास तक्रारवजा सूचना/ निवेदने प्राप्त होत असतात.
सद्यस्थितीत तलाठी गट-क संवर्गाची एकूण मंजूर पदे १५ हजार ७४४ इतकी असून त्यापैकी ५ हजार ३८ इतकी पदे रिक्त आहेत.त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात येतो.उक्त रिक्त तलाठी पदांपैकी ४ हजार ६४४ तलाठी पदे भरण्याच्या अनुषंगाने दि.२६ जुन २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तलाठ्यांना सजातील गावांना भेटी देणे,पंचनामे,स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयांकडे असणाऱ्या बैठका,राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी उपस्थित रहावे लागते.यास्तव अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना सजा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही.सबब एकापेक्षा जास्त गावाकरीता एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी/गावाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.याकरीता यापूर्वी दि.०६ जानेवारी २०१७ च्या शासन पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.
डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करा
आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
लठ्ठपणाने त्रस्त आहात? तर तुम्हाला सोडाव्या लागतील या सवयी
अंधश्रध्देचा बाजार : सुशिक्षित लोकही भोंदूबाबांच्या जाळ्यात !
डेंग्यू : लक्षणे आणि औषधोपचार
परंतु प्राप्त परिस्थितीत रिक्त तलाठी पदाची भरतीप्रक्रिया पूर्ण होवून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार राहणार आहे. तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरीता सर्व तलाठी यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालये व अन्य शासकीय इमारतीवर लावण्याबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करीत आहे :
(१) तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठयांनी त्यांचा नियोजित दौरा/बैठक/कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात दिसेल अशा पध्दतीने सूचना फलक आगाऊ वेळेत लावावा.
(२) तलाठ्यांनी सज्जा कार्यालयीन ठिकाणी उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करून सदर वेळापत्रक संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे, तसेच सदर वेळापत्रक संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठविण्यात यावे.
(३) तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरुपात लावावा.तसेच संबंधित सज्जाचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नांव दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत,
(४) जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येते की,त्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालयीन प्रमुख / तलाठी कार्यालये यांच्या निदर्शनास सदर निदेश आणावेत.
2 Comments
Anonymous
महसूल विभागच अतिशय भ्रष्ट आहे. तलाठी कधीच सज्जावर हजर नसतो. फक्त मीटिंगच्या नावाखाली तहसील कार्यालयात बोंबलत हिंडत असतात याला जबाबदार तहसीलदार आहेत कोणत्याही तलाठ्याला तहसील कार्यालयाची पायरी चढून देऊ नये सर्व तलाठ्यांच्या मीटिंग ऑनलाईन घ्याव्यात तलाठी पूर्ण वेळ सज्जावर उपस्थित असला तरच त्याचा पगार द्यावा अन्यथा देऊ नये शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून द्यावीत तलाठ्यासमोर शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्रासाठी जावं लागू नये अशी व्यवस्था करा
Sandeep Patil
महसूल विभागच अतिशय भ्रष्ट आहे. तलाठी कधीच सज्जावर हजर नसतो. फक्त मीटिंगच्या नावाखाली तहसील कार्यालयात बोंबलत हिंडत असतात याला जबाबदार तहसीलदार आहेत कोणत्याही तलाठ्याला तहसील कार्यालयाची पायरी चढून देऊ नये सर्व तलाठ्यांच्या मीटिंग ऑनलाईन घ्याव्यात तलाठी पूर्ण वेळ सज्जावर उपस्थित असला तरच त्याचा पगार द्यावा अन्यथा देऊ नये शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून द्यावीत तलाठ्यासमोर शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्रासाठी जावं लागू नये अशी व्यवस्था करा