अधोरेखित ऑनलाइन डेस्क । बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीचा निकाल कधी लागणार या बाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून उद्या 2 जून रोजी हा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 067 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. याशिवाय 8 हजार 189 दिव्यांग विद्यार्थी व 73 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.
दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?
येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल 2023 पाहू शकतात…
🌑 सर्वप्रथम mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
🌑 मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र एसएससी निकाल लिंकवर क्लिक करा.
🌑 आवश्यक तपशील सबमिट करा आणि महाराष्ट्र 10वीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
🌑 निकाल PDF मध्ये नमूद केलेल्या तपशीलांची पडताळणी करा आणि डाउनलोड करा.
🌑 भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 10 वी निकाल 2023 ची प्रिंट काढा.
या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होतील
विद्यार्थी पुढील वैकल्पिक वेबसाइटवरून त्यांचा MH SSC निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
गुणपडताळणी कशी कराल ?
ऑनलाईन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक 03/06/2023 ते सोमवार, दिनांक 12/06/2023 पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक 03/06/2023 ते गुरूवार, दिनांक 22/06/2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.