Last Updated on 05 Nov 2023 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी करारानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या व्यापारात लक्षणीय वाढ झाली आहे. हा करार १ मे २०२२ रोजी अंमलात आला आणि ११ महिन्यांच्या कालावधीत भारतातून संयुक्त अरब अमिरातीतली निर्यात जवळपास १२ टक्क्यांनी वाढून ३१ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे.
अनेक कामगार-केंद्रित आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या दृष्टीने वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितलं. CEPA सुरू झाल्यानंतर पाच वर्षांत भारत आणि UAE मधील व्यापार 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.











































































