🌑 हा रस्ता आहे राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सांगली जिल्ह्यातला…पेठनाका-सांगली रस्ता.
🌑 हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.पण,याचे कोणालाही सोयरसूतक नाही
🌑 सार्वजनिक बांधकाम विभाग । ‘त्या’ विभागाच्या काही अधिकाऱ्यांची दिवसेंदिवस संपत्ती वाढत आहे.पण,याचे सोयरसूतक त्यांना नाही
🌑 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सांगली । पेठनाका-सांगली हा मार्ग नेहमी वर्दळीचा आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा मार्ग आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीच या रस्त्याबाबत उदासीनता दाखवली आहे.या रस्त्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे तरीही हा विभाग नेहमीच काही ना काही कारणे देत जबाबदारी झटकत असल्याचे दिसत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.याउलट या मोठ्या मोठ्या खड्डयांमुळे दररोज अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.मोठ्या खड्डयांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत,तर काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे.याचे कसलेच काही सोयरसुतक ना नेत्यांना-ना सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.
हा मार्ग सध्या जरी केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असला तरी किमान या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.आजकाल पाणंद रस्त्यांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मिळत आहे.जिल्ह्यातील काही पाणंद रस्तेही या रस्त्यापेक्षा चांगले आहेत.नाहीतर पेठनाका-सांगली रस्ता…छे! हो, गड्या आपला पाणंद रस्ता बरा ! असे यानिमित्ताने म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले !
सर्व छायाचित्रे : भगवान पाटील