सांगली । राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बीलातुन पूरग्रस्त निधी म्हणून प्रतिटन पंधरा रुपये वसूल करण्याचे परिपत्रक काढले आहे. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे. हे कदापि खपवून घेणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला आहे.
भागवत जाधव म्हणाले की, साखर उद्योगकडुन दरवर्षी १२ हजार कोटी रुपयांचा कर महसूल दिला जातो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कडुन पुरग्रस्त निधी १० रुपये गोपिनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ १० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी ५ रुपये राज्य साखर संच १रुपया वसंतदादा पाटील साखर संस्था १रुपये साखर आयुक्त निधी ०:५० पैसे असा मिळुन २७:५० रुपये प्रतिटन राज्यशासन कपात करणार आहे. आधीच जास्त पर्जन्यमान मुळे ऊसाचं उत्पादन घटले आहे. फडवणीस सरकार जर भिक लागली तर फडवणीस सरकारला आम्ही ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या मनाने १०० रुपये प्रतिटन राज्यशासन द्याला तयार आहे. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०:२५ रिकवरी बेस बदलून पुर्वी प्रमाणे ८:२५ रिकवरी बेस करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, वजनातील काटेमारी रोखण्यासाठी ऑनलाइन वजन काटे करावे. शेतकऱ्यांना ऊस बाहेरील वजन काट्यावर वजन करून कारखानदाराने ग्राह्य धरावे.ह्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गोष्टी कराव्यात व खुशाल ऊस उत्पादक शेतकरी पैसे द्यायला तयार आहे. जुन्या म्हणं प्रमाणे ‘आयजी जिवावर बायजी उधार” हा राज्यसरकारने धंदा बंद करावा. हे कदापि ऊस उत्पादक शेतकरी खपवून घेणार नाही सदरचा निर्णय राज्य सरकारने रद्द करावा.
Recent Posts
बातमी शेअर करा : कोजागरी पौर्णिमा सोमवार दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 दिवसा नवान्न प्राशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे मम सकल -अलक्ष्मी... Read more