१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
पुणे | भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात भू-करमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे.
उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेसाठीची पात्रता :
मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल.
आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : कोजागरी पौर्णिमा सोमवार दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 दिवसा नवान्न प्राशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे मम सकल -अलक्ष्मी... Read more