सांगली । बोरगाव येथील श्री बलभीम विकास सेवा सोसायटीची 101 वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भीमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अहवाल सालामध्ये संस्थेला 17 लाख 50 हजार रुपयाचा नफा झाला असून सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले उपाध्यक्ष सुजाता देसाई संचालक सुनील पाटील भाऊसो पाटील सिताराम पाटील अमोल डांगे सागर पाटील गौतम कांबळे शीतल पाटील यांच्यासह सल्लागार सभासद उपस्थित होते. सचिव सर्जेराव पाटील यांनी नोटीस वाचन केले.संचालक विजय शिंदे यांनी स्वागत केले. वैभव शिंदे यांनी आभार मानले.