सातारा । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुट ६ इंचांवरून ३ फुटांपर्यंत खाली आणून १९ हजार ८०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज (२१ ऑगस्ट) सकाळपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. बुधवारी (२० ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत कोयना धरमातून ९५,३०० क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. सध्या कोयनानगर मध्ये पाऊस सकाळसारखाच मध्यम प्रमाणात आहे.
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये आता एकूण २१ हजार ९०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
Major Dam Outflow
२१ ऑगस्ट 2025 रात्री ९ वाजता
1) कोयना धरण – २१९०० क्युसेक
2) धोम धरण – ०० क्युसेक
3) धोम-बलकवाडी धरण – ०० क्युसेक
4) कण्हेर धरण – ७४० क्युसेक
5) उरमोडी धरण – ४५० क्युसेक
6) तारळी धरण – ०० क्युसेक
7) वीर धरण – १६९३९ क्युसेक
Recent Posts
बातमी शेअर करा : कोजागरी पौर्णिमा सोमवार दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 दिवसा नवान्न प्राशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे मम सकल -अलक्ष्मी... Read more