सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा पॉवरलिप्टर मनीष विजय यादव (बनेवाडी) याने काठमांडू (नेपाळ) येथील ६ देशांचा समावेश असलेल्या आशियाई पॉवरलिप्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांचे प्रोत्साहन व पाठबळ लाभले आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, प्रतिकदादा पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मनीष याने काठमांडू (नेपाळ) येथे १८ वर्षाखालील १२० किलो गटात पॉवरलिप्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्याला महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदेल सोंडे,हर्षद बारे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले आहे.
मनीष हा राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियममधील अद्यावत व्यायाम शाळेत सराव करतो. तो सध्या इस्लामपूर येथील विद्यामंदीर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : कोजागरी पौर्णिमा सोमवार दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 दिवसा नवान्न प्राशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे मम सकल -अलक्ष्मी... Read more