सांगली । राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बहे गाव अध्यक्षपदी अवधूत मोहिते, तर कार्याध्यक्षपदी महेश शिंदे यांची मोठ्या धुमधडाक्यात निवड करण्यात आली. युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी बहे गावात जाऊन जेष्ठ नेते व युवा सहकाऱ्यांशी चर्चा करून दोन तडफदार युवकांची फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांच्या निनादात निवड केली. युवक अध्यक्ष प्रशांत थोरात यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याने या निवडीस महत्व होते.
नूतन अध्यक्ष अवधूत मोहिते,कार्याध्यक्ष महेश शिंदे यांनी बहे गावातील युवा संघटन अधिक मजबूत करू,अशी ग्वाही दिली. यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील,माजी संचालक माणिकराव पाटील यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील,सोसायटीचे माजी अध्यक्ष जयदीप पाटील,मनोज पाटील,तालुका चिटणीस विनायक यादव,सदस्य रोहित तोरस्कर,तसेच जयदीप थोरात,दिनकर पाटील,अविनाश पाटील,संदीप थोरात, रामचंद्र पाटील,सूरज पाटील,रोहित खोत, संकेत पाटील,विशाल कोळी,भीमराव कुंभार, हणमंत नावडकर,जालिंदर पाटील,जालिंदर देशमुख,संजय बावचकर,हणमंत पाचुंब्रे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.