सांगली । इस्लामपूर येथील महाराष्ट्र अकॅडमीच्या दोन विद्यार्थिनींची नगरपरिषद परीक्षा – 2003 मध्ये अधिकारी पदी निवड झाली. यामध्ये पूनम जालिंदर मानुगडे, जुळेवाडी ( भिलवडी स्टेशन) हिची कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क पदी निवड झाली आहे तर सविता रामचंद्र खोत,येलूर हिची लेखा परीक्षण व लेखा सेवा विभागामध्ये अधिकारी पदी निवड झाली आहे.
नगर परिषद परीक्षा 2023 मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र अकॅडमी चे अध्यक्ष बशीर सुतार शिकलगार व इंग्रजी विषयाचे तज्ञ प्राध्यापक समीर सताळकर यांच्या हस्ते पार पडला.
पूनम मानुगडे म्हणाल्या,बी कॉम ची पदवी घेऊन महाराष्ट्र अकॅडमी, इस्लामपूरमध्ये प्रवेश घेतला.पहिल्याच प्रयत्नात पी.एस.आय ची पूर्व परीक्षा पास झाले.सलग 16 एम.पी.एस.सी.च्या मुख्य परीक्षा दिल्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक दोन मार्कांमध्ये पद हुकत होते. माझ्या प्लॅन वरती बऱ्याच मुलींना पोस्ट मिळाली. स्वतःची बहीण पोलीस दलामध्ये दाखल झाली. आपण जिद्दीने अजूनही प्रयत्न करूया पद मिळेपर्यंत ही लढाई करतच राहायचं या जिद्दीने प्रयत्न करत राहिले . आई-वडिलांचा मानसिक आधार व महाराष्ट्र अकॅडमी चे विशेष प्रयत्न यातूनच मला नगरपरिषद विभागांमध्ये कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी पद मिळाले. विशेष म्हणजे माझ्या ग्रुप मधल्या सर्व मुलींना महाराष्ट्र अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळाली आहे.
सविता रामचंद्र खोत म्हणाल्या, एम. कॉम ची पदवी घेऊन महाराष्ट्र ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. सातत्याच्या दोन वर्षाच्या प्रयत्नातून राज्य कर निरीक्षक व मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी या परीक्षेमधून दोन मार्कांनी पद हुकले. हाताच्या अंतरावर च्या यशाने हुलकावणी दिली होती. या अपयशाने डिप्रेशन आले, खूप जवळची माणसं नाराज झाली, हताश न होता पुन्हा प्रयत्न सुरू केले,मेडिटेशन केले. स्पर्धा परीक्षेसाठी नेमके काय आवश्यक आहे याचा संपूर्ण अभ्यास केला,पुन्हा जोमाने नव्या पॅटर्न ने अभ्यासाला सुरुवात केली. आपलं एम. कॉम झाला आहे. आपल्या विषय अभ्यास अकाउंटन्सी च्या आधारित पदाकरिता प्रयत्न करूयात असा मनामध्ये निर्धार केला. व्हाट्सअप, टेलिग्राम,युट्युब पासून संपूर्ण दूर झाले. सातत्याने दहा बारा तास अभ्यास केला. नगरपरिषद परीक्षा – 2023 मधील लेखापरीक्षण व लेखा सेवा विभागांमध्ये लेखा अधिकारी हे पद मिळालं. मला माझी ड्रीम पोस्ट मिळाली याचं खूप समाधान आहे. या सत्कार समारंभ प्रसंगी प्रा. समीर सताळकर सर म्हणाले, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही विद्यार्थिनींनी नगरपरिषद परीक्षा – 2023 मध्ये उत्तुंग यश प्राप्त केले आहे. जीवनामध्ये संघर्ष आहे. प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतः लढायची असते. आई-वडिलांचा मानसिक आधार, आर्थिक पाठबळ व महाराष्ट्र ॲकॅडमी मधील विषय तज्ञ प्राध्यापक उत्कृष्ट व सखोल मार्गदर्शन करत आहेत. याचमुळे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत. महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूरचे संस्थापक सचिव श्री असलम शिकलगार यांनी 1999 असून महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांचा इस्लामपूर पॅटर्न यशस्वी केला आहे. शिकलगार सरांचे हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आज यशस्वीपणे कार्यरत आहेत.
या सत्कार समारंभ मध्ये पूनम मानुगडे च्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अकॅडमी चे अध्यक्ष बशीर सुतार शिकलगार यांचा बुके शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. महाराष्ट्र अकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी बनविण्याचे करण्याचे कार्य करत आहे याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.या यशस्वी विद्यार्थिनींना प्रा. सुभाष खोत, प्रा. उमाकांत वाघमारे, प्रा. प्रकाश कुंभार, प्रा. बालाजी गावंडे, प्रा. समीर सताळकर, प्रा. अजित प्रधान, प्रा. नाथाजी पाटील व श्री. असलम शिकलगार, संस्थापक सचिव महाराष्ट्र अकॅडमी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मित्र परिवार, पै पाहुणे यांच्याकडून कौतुक होत आहे. नगरपरिषद परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संयोजन धैर्यशील पाटोळे, वैभव यादव, मयुद्दीन जमादार, तोफिक मुल्ला व वर्षा बामणे, निलोफर शिकलगार यांनी केले. सदर कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक मित्रपरिवार पै पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.